आधी लावले झाड आणि मगच घातले हार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 04:37 PM2019-07-08T16:37:42+5:302019-07-08T16:51:37+5:30
वाढत्या प्रदूषणाला मात देण्यासाठी वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही. याचेच महत्व ओळखून पुण्याजवळील शिक्रापूर भागातल्या नवविवाहित जोडप्याने लग्नाआधी वृक्षारोपण करूनच नव्या आयुष्याला सुरुवात केली.
पुणे : वाढत्या प्रदूषणाला मात देण्यासाठी वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही. याचेच महत्व ओळखून पुण्याजवळील शिक्रापूर भागातल्या नवविवाहित जोडप्याने लग्नाआधी वृक्षारोपण करूनच नव्या आयुष्याला सुरुवात केली.
सध्या संपूर्ण जगात वृक्षांची संख्या कमी होत असल्याने पर्यावरणाचे मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. अशावेळी अनेक संस्था वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबवत आहेत. याच कार्यक्रमात लग्नाच्या आधी वृक्षारोपणाला महत्व देऊन मगच एका जोडप्याने एकमेकांसोबत आयुष्य व्यतीत करण्याचे ठरवले आहे. त्यांचे हे फोटो व्हायरल झाले असून पंचक्रोशीत त्यांचे कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हिवरे कुंभार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने वृक्षदिंडी काढून वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी लग्नाआधी मिरवणुकीस निघालेल्या नवरदेवाने देखील वृक्षारोपण केले. त्याचा हा फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. गणेश साहेबराव मांदळे असे संबंधित वराचे नाव असून त्याने वधूसह वृक्षारोपण केले.