वडिलांची म्हातारपणात स्वतःसाठीच विवाह नावनोंदणी; मुलाने चिडून वडीलांचा केला दगडाने ठेचून खून

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 11:17 AM2022-01-07T11:17:31+5:302022-01-07T11:18:01+5:30

म्हतारपणात वडिलांनी स्व:ताच्या लग्नासाठी वधु - वर सुचक मंडळात विवाह नांव नोंदणी केल्यामुळे चिडून जाऊन मुलाकडून वयोवृध्द वडीलांचा दगडाने ठेचुन खुन झाल्याची घटना राजगुरूनगर शहरात घडली आहे

Marriage registration of the father himself in old age The boy got angry and killed his father by crushing him with a stone in khed rajgurunagar | वडिलांची म्हातारपणात स्वतःसाठीच विवाह नावनोंदणी; मुलाने चिडून वडीलांचा केला दगडाने ठेचून खून

वडिलांची म्हातारपणात स्वतःसाठीच विवाह नावनोंदणी; मुलाने चिडून वडीलांचा केला दगडाने ठेचून खून

googlenewsNext

राजगुरुनगर : म्हतारपणात वडिलांनी स्व:ताच्या लग्नासाठी वधु - वर सुचक मंडळात विवाह नांव नोंदणी केल्यामुळे चिडून जाऊन मुलाकडून वयोवृध्द वडीलांचा दगडाने ठेचुन खुन झाल्याची घटना राजगुरूनगर शहरात घडली आहे. शंकर रामभाउ बो-हाडे ( वय ८० ) रा, वैशांयपन आळी, राजगुरूनगर ता. खेड, असे खुन झालेल्याचे नांव आहे. याबाबत आरोपी शेखर शंकर बो-हाडे (वय ४७ ) याला पोलिसांनीअटक केली आहे. खून केल्याची कबुली व फिर्याद स्वःता आरोपीने पोलिस ठाण्यात येऊन दिली.

या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर रामभाउ बो-हाडे यांनी परस्पर वधु - वर सुचक मंडळात पैसे भरून स्वत:च्या लग्नाची नोंदणी केली होती. याबाबत आरोपी मुलगा शेखर बो-हाडे यांच्याशी वडील शंकर बोऱ्हाडे खोटे बोलले. या गोष्टीचा राग अनावर झाल्याने शेखर बोऱ्हाडे यांने किचन रूममधील कांदा कापण्याची सुरी घेवुन वडीलांचा गळा कापण्याचा प्रयत्न केला. परंतु सुरीला धार नसल्याने गळा कापला गेला नाही. घरात असलेल्या दगडी वरवंटयाने वडील शंकर बोऱ्हाडे यांच्या तोंडावर व डोक्यात जोराचे प्रहार करून खून केला. या घटनेचा पुढील तपास खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतिश गुरव करित आहे.

Web Title: Marriage registration of the father himself in old age The boy got angry and killed his father by crushing him with a stone in khed rajgurunagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.