Marriage: सप्तपदीसोबत सहा अटी, करार करून त्यांनी केलं लग्न, अटी वाचून तुम्ही म्हणाल...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 10:33 AM2023-02-25T10:33:20+5:302023-02-25T10:38:00+5:30
Jara Hatke News: लग्नात सप्तपदी घेताना सात वचनं घेतली जातात. मात्र सध्या एका नवरा नवरीने लग्नाआधी करार करून एकमेकांना घातलेल्या अटींची चर्चा होत आहे. या अटींचे पत्रक सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पु
लग्नात सप्तपदी घेताना सात वचनं घेतली जातात. मात्र सध्या एका नवरा नवरीने लग्नाआधी करार करून एकमेकांना घातलेल्या अटींची चर्चा होत आहे. या अटींचे पत्रक सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पुण्यात झालेल्या एका लग्नात या वधू वरांनी करार करत एकमेकांना घातलेल्या या अटी पाहून वऱ्हाडी मंडळींही अवाक झाले.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात असलेल्या गावडेवाडी गावातील कृष्णा लंबे आणि जुन्नरमधील नारायणगाव येथील सायली ताजणे यांचा विवाह नुकताच संपन्न झाला. गुरुवार २३ फेब्रुवारी रोजी झालेल्या या विवाह सोहळ्यापूर्वी आपल्या भावी संसारासाठी या दोघांनीही करारनामा करत एकमेकांसाठी काही अटी घातल्या. या अटींचा करारनामा करत त्यावर साक्षीदार म्हणून नातेवाईकांच्या सह्याही घेतल्या. या करारनाम्याचा फलक लग्नात लावण्यात आला होता. तो पाहून लग्नाला आलेली वऱ्हाडी मंडळी आणि पाहुणेसोयरे आश्चर्यचकीत होत होते.
या करारनाम्यातील अटी वाचल्यावर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. या अटी पुढील प्रमाणे आहेत.
पहिली अट - कृष्णा - सायलीचं म्हणणं नेहमी बरोबरच असेल
दुसरी अट - सायली - मी कृष्णाकडे शॉपिंगसाठी हट्ट धरणार नाही
तिसरी अट - सायली - मी कृष्णाला मित्रांसोबत फिरायला, पार्टीला जायला अडवणार नाही (महिन्यातून दोन वेळा)
चौथी अट - कृष्णा - मी सायलीची आणि ति आई वडिलांचीही सेवा करेन
पाचवी अट - मी कृष्णाचे मित्र घरी आल्यावर त्यांच्यासाठी स्वत:च्या हाताने जेवण बनवेन
सहावी अट - आमच्यात वादविवाद झाले तरी ते आमचे आम्ही एका दिवसात मिटवू.
वधूवरांना एकमेकांना भावी संसारासाठी अटी घालत, करारनामा करून विवाह केल्याने हा विवाह सोहळा वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे.