Pune: सतराव्या वर्षी लग्न; प्रसूतीवेळी बाळ दगावले, पीडितेच्या तक्रारीनंतर आईसह सासरच्यांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 12:39 PM2024-05-11T12:39:32+5:302024-05-11T12:40:01+5:30
पीडितेच्या आईसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....
पुणे : मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानादेखील तिचे लग्न लावून देण्यात आले. त्यानंतर पीडिता ८ महिन्यांची गर्भवती असताना प्रसूतीदरम्यान बाळ मरण पावले. यामुळे पीडितेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. यामुळे पीडितेच्या आईसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय पीडितेचे ती अल्पवयीन असल्याचे माहीत असताना तिच्या आईने लग्न लावून दिले. लग्नानंतर पीडिता ८ महिन्यांची गरोदर असताना प्रसूतीदरम्यान तिचे बाळ मृत झाले. यानंतर पीडितेने तिची आई, पती, सासरा, दीर व अन्य एका जणाविरोधात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी आरोपींविरोधात पोस्को, बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पवार करत आहेत.