विष प्राशन करत विवाहित महिलेने संपवले जीवन; बारामती तालुक्यातील सांगवी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 09:57 PM2021-05-27T21:57:32+5:302021-05-27T21:58:15+5:30

रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल न झाल्याने आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट आहे.

Married woman ends her life by drinking poison; Incident at Sangvi in Baramati taluka | विष प्राशन करत विवाहित महिलेने संपवले जीवन; बारामती तालुक्यातील सांगवी येथील घटना

विष प्राशन करत विवाहित महिलेने संपवले जीवन; बारामती तालुक्यातील सांगवी येथील घटना

Next

सांगवी : सांगवी (ता. बारामती ) येथील एक वर्षापूर्वी विवाह झालेल्या विवाहित महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. विष प्राशन केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी संतापलेल्या महिलेच्या नातेवाईकांनी बारामतीच्या खासगी रुग्णालयात गोंधळ घातला होता.

गितांजली अभिषेक तावरे ( वय २१ ) असे आत्महत्या केलेल्या मृत विवाहितेचे नाव आहे. मात्र, आत्महत्येचे कारण उघड न झाल्याने ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत परिसरात चर्चेला उधाण आले आहे. या प्रकाराबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेने राहत्या घरात दोन दिवसांपूर्वी विष प्राशन केले होते.दरम्यान विवाहित महिलेला बारामतीमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यास आले होते. मात्र, प्रकृती चिंताजनक झाल्याने पुढील उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.तिथे उपचारादरम्यान महिलेचा गुरुवारी ( दि.२७ ) सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान,मृतदेह पुणे येथे असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याचे बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी सांगितले.  सकाळपासूनच बारामती-फलटण राज्यमार्ग तसेच विवाहित महिलेच्या बंगल्याबाहेर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल न झाल्याने आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट आहे.

Web Title: Married woman ends her life by drinking poison; Incident at Sangvi in Baramati taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.