नागपूरच्या विवाहित महिलेला लग्नाचे आमिषाने पुणेकर भामट्याने फसवलं, वाचा नेमकं काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 12:04 PM2022-01-08T12:04:09+5:302022-01-08T12:06:20+5:30

फिर्यादी महिलेने त्याला आपली आपबिती सांगितल्यावर त्याने घटस्फोट मिळवून देतो आणि त्यानंतर आपण लग्न करूयात असे आमिष दाखवले

married woman from Nagpur was cheated by lure of marriage pune crime news | नागपूरच्या विवाहित महिलेला लग्नाचे आमिषाने पुणेकर भामट्याने फसवलं, वाचा नेमकं काय झालं?

नागपूरच्या विवाहित महिलेला लग्नाचे आमिषाने पुणेकर भामट्याने फसवलं, वाचा नेमकं काय झालं?

Next

पुणे: नागपूर येथील एका 36 वर्षीय विवाहितेला नवऱ्यापासून घटस्फोट मिळवून देण्याचे आणि त्यानंतर लग्न करण्याचे आमिष दाखवून एका पुण्यातील वतीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिच्या जवळील सोन्याचे दागिने घेऊन तो पसार झाला. या महिलेच्या पतीला जेव्हा सर्व प्रकार कळला त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी समीर बेगमपुरे (रा. पुणे, पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही विवाहित असून नागपूरची आहे. नवऱ्यासोबत सतत होणाऱ्या भांडणाला कंटाळून तिने दुसरे लग्न करावे या हेतूने एका लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवर नाव नोंदवले होते. ह्याच वेबसाइटवरून तिची समीर बेगमपुरेसोबत ओळख झाली होती. फिर्यादी महिलेने त्याला आपली आपबिती सांगितल्यावर त्याने घटस्फोट मिळवून देतो आणि त्यानंतर आपण लग्न करूयात असे आमिष दाखवले.

त्यानंतर तिला नागपूरहून पुण्यात बोलावून घेतले. जुलै 2021 मध्ये फिर्यादी महिला पुण्यात आली होती. कात्रज परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये ते दोघे एकत्र राहिले. त्याठिकाणी आरोपीने फिर्यादी महिलेसोबत शरीर संबंध ठेवले आणि तिला परत पाठवताना तिच्या पर्समधील 108 ग्रॅम वजनाचे तीन लाख 25 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तिच्या नकळत काढून घेतले.  

दरम्यान फिर्यादी महिला नागपूरला परत गेल्यानंतर दागिने चोरीला गेल्याचे तिच्या लक्षात आले. परंतु नवर्‍याच्या भीतीने ती याबाबत कोणालाही बोलली नव्हती. काही महिन्यानंतर बायकोच्या अंगावर दागिने दिसत नसल्याने नवऱ्याने तिला दागिन्याबाबत विचारणा केली असता तिने जे काही घडले ते सांगून टाकले. या सर्व प्रकारानंतर दोघेही पती-पत्नी पुण्यात आले आणि त्यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश ढमे करीत आहेत.

Web Title: married woman from Nagpur was cheated by lure of marriage pune crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.