नोकरीच्या आमिषातून पतीच्या मित्राचा विवाहितेवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 07:37 PM2019-07-26T19:37:33+5:302019-07-26T19:41:35+5:30
नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून पतीचा मित्र व त्याच्या मित्राने अत्याचार केला. तसेच पीडित विवाहितेस व तिच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली.
Next
ठळक मुद्देनोकरीच्या आमिषातून पतीच्या मित्राचा विवाहितेवर अत्याचार एका आरोपीस अटक : पतीचा मित्र व त्याच्या मित्राने केला अत्याचार
पिंपरी : नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून पतीचा मित्र व त्याच्या मित्राने अत्याचार केला. तसेच पीडित विवाहितेस व तिच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली. १ ते ३ जुलै या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक भोगील (रा. पावडे वस्ती, हडपसर), विष्णू व अतुल अशी आरोपींची नावे आहेत. विवेक भोगील याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.
आरोपी अतुल हा पीडितेच्या पतीचा मित्र आहे. तुम्हाला चांगली नोकरी लावून देऊ, असे आमिष दाखवून त्या बहाण्याने आरोपी अतुल याने विवाहितेला गोवा येथे नेले. तेथे अतुल व त्याचा मित्र विष्णू यांनी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा दुसºया दिवशी गोवा येथून कात्रज येथे त्यांच्या मित्राच्या घरी नेले व त्याठिकाणी विवेक भोगील याने विवाहितेवर अत्याचार केला. त्यानंतर विवाहितेला कात्रज रोडवर सोडून दिले. याबाबत कोणाला काही सांगितल्यास तिला व तिच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी आरोपींनी पीडितेला दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.