मुलगा होत नाही आणि दुसऱ्या लग्नाला विरोध केल्याने छळ; दीड वर्षाच्या मुलीसह विवाहितेची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 10:41 PM2021-06-11T22:41:47+5:302021-06-11T22:42:26+5:30
पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील घटना
नारायणगाव : मुलगा होत नाही, तसेच दुसऱ्या लग्नाला विरोध केल्याने होणाऱ्या सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आपल्या दीड वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना हिवरे तर्फे नारायणगाव येथे शुक्रवारी (दि. ११) घडली.
याप्रकरणी पती, दीर आणि सासू, सासरे यांना नारायणगाव पोलिसांनीअटक केली आहे. संतप्त झालेल्या माहेरच्या नातेवाइकांनी विवाहितेचा अंत्यसंस्कार पतीच्या घरासमोरच केला. रंजना अविनाश तांबे (वय ३०) या विवाहितेने मुलगी श्रीशा अविनाश तांबे (वय दीड वर्ष, देवजाळी, हिवरे तर्फे नारायणगाव, ता. जुन्नर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
याप्रकरणी रंजनाचा पती अविनाश बंडू तांबे, दीर संतोष बंडू तांबे, सासरे बंडू लक्ष्मण तांबे, सासू बायडाबाई बंडू तांबे (सर्व रा. देवजाळी) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी बुधा बबन ठवरे (रा. ढवळपुरी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) यांनी फिर्याद दिली.
रंजना तांबे हिचा विवाह अविनाश बंडू तांबे याच्याशी २००९ साली झाला होता. लग्नानंतर तीन वर्षांनी रंजनाला नवरा, सासू, सासरे, दीर हे मानसिक त्रास देऊन मारहाण करून शिवीगाळ करत होते.