हुतात्मा स्मारक परिसर झाला चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:12 AM2021-01-25T04:12:16+5:302021-01-25T04:12:16+5:30
लोकमत न्यूजवर्क जुन्नर : शहर शिवसेना परीवारातर्फे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या औचीत्याने जुन्नर शहरातील हुतात्मा स्मारक तसेच ...
लोकमत न्यूजवर्क
जुन्नर : शहर शिवसेना परीवारातर्फे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या औचीत्याने जुन्नर शहरातील हुतात्मा स्मारक तसेच डॉ. बाबासाहेब आंबडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अहील्याबाई होळकर यांच्या पुतळ्यांची स्वच्छता करण्यात आली, अशी माहिती शिवसेना जुन्नर शहराध्यक्ष चंद्रकांत डोके व नगराध्यक्ष शाम पांडे यांनी दिली.
या कार्यक्रमात सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्याचप्रमाणे शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला देखील सुरुवात करण्यात आली. हुतात्मा स्मारक, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, बाबासाहेब आंबेडकर स्मारक, दादोजी कोंडदेव पुतळा, सरकारी दवाखाना येथील पुतळ्याची स्वच्छता शिवसैनिकांच्या वतीने श्रमदानातुन करण्यात आले.
शिवसेना उपतालुका अविनाश करडिले, शहरसमन्वयक शामराव खोत, शहरप्रमुख चंद्रकांत डोके, ज्ञानेश्वर होगे, नगराध्यक्ष शाम पांडे, उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी, गटनेते समीर भगत, नगरसेवक नरेंद्र तांबोळी, वैभव मलठणकर, युवासेना अध्यक्ष विशाल परदेशी, नगरसेविका सुवर्णा बनकर, अंकिता गोसावी, कविता गुंजाळ तसेच सर्व शिवसैनिक व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ: जुन्नर शहरात जे पी जनाबाई रोकडे यांच्यात पुतळ्यास अभिवादन करताना नगरसेवीका सुवर्णा बनकर,कविता गुंजाळ, अंकिता गोसावी , शहरप्रमुख चंद्रकांत डोके,नगरसेवक नरेंद्र तांबोळी, ज्ञानेश्वर होगे.