डॉ. मीना प्रभू यांना 'मसाप जीवनगौरव'; फ्रान्सिस वाघमारे यांना 'डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार' जाहीर

By नम्रता फडणीस | Published: May 14, 2024 02:44 PM2024-05-14T14:44:06+5:302024-05-14T14:44:57+5:30

मसापचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार

Masap Lifetime Achievement to Dr. Meena Prabhu Francis Waghmare was named 'Dr. Bhimrao Kulkarni Worker Award' announced | डॉ. मीना प्रभू यांना 'मसाप जीवनगौरव'; फ्रान्सिस वाघमारे यांना 'डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार' जाहीर

डॉ. मीना प्रभू यांना 'मसाप जीवनगौरव'; फ्रान्सिस वाघमारे यांना 'डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार' जाहीर

पुणे: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा ज्येष्ठ भाषा अभ्यासक आणि लेखिका डॉ. अंजली सोमण पुरस्कृत 'मसाप जीवनगौरव' पुरस्कार प्रसिद्ध लेखिका डॉ. मीना प्रभू यांना तर 'डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार' फ्रान्सिस वाघमारे (नाशिक) यांना जाहीर झाला आहे.

मसापच्या २७ मे रोजी होणाऱ्या ११९ व्या वर्धापनदिन समारंभात परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात मसापचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. 'मसाप जीवनगौरव' पुरस्काराचे स्वरूप २५
हजार रुपये व सन्मानपत्र आणि 'डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराचे स्वरूप ११ हजार रुपये आणि सन्मानपत्र असे आहे. मसापच्या दि. २७ मे रोजी होणाऱ्या ११९ व्या वर्धापनदिन समारंभात परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात मसापचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त डॉ. पी. डी. पाटील, विश्वस्त यशवंतराव गडाख, उपाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, राजीव बर्वे आणि विद्याधर अनास्कर यावेळी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

Web Title: Masap Lifetime Achievement to Dr. Meena Prabhu Francis Waghmare was named 'Dr. Bhimrao Kulkarni Worker Award' announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.