मशेरी सुदृढ बाळासाठी घातक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 01:51 AM2018-07-21T01:51:58+5:302018-07-21T01:52:03+5:30

मशेरी तसेच तंबाखूचा वापर करणाऱ्या महिलांमध्ये अ‍ॅनिमियाचे प्रमाण अन्य महिलांच्या तुलनेत चार पटीने जास्त असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे.

 Mascheri is dangerous for healthy baby! | मशेरी सुदृढ बाळासाठी घातक!

मशेरी सुदृढ बाळासाठी घातक!

googlenewsNext

पुणे : मशेरी तसेच तंबाखूचा वापर करणाऱ्या महिलांमध्ये अ‍ॅनिमियाचे प्रमाण अन्य महिलांच्या तुलनेत चार पटीने जास्त असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. तंबाखूचा वापर करणाºया महिलांच्या नवजात शिशूंचे वजनही तुलनात्मकदृष्ट्या कमी असल्याचे अभ्यासात निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये अल्प उत्पन्न गटातील महिलांचे प्रमाण अधिक आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मानवशास्त्र विभागाअंतर्गत डॉ. हेमलता शेडगे यांनी हे संशोधन केले आहे. त्या सध्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील सीटीयू विभागात कार्यक्रम व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत.
‘तंबाखूच्या वापराने गर्भवती महिलांवर होणार परिणाम’ या विषयावर त्यांनी मागील महिन्यात शोधप्रबंध सादर केला आहे. त्यासाठी त्यांनी २०१४-१५ या वर्षात अभ्यास केला. मशेरी हा प्रकार महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांकडून मशेरीचा वापर जास्त केला जातो, असे जागतिक तंबाखू सर्वेक्षणामध्ये नोंदविण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर मानवशास्त्र विभागामधील प्रा. शौनक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या अभ्यासात शेडगे यांनी तंबाखूचा
वापर न करणाºया महिलांच्या
तुलनेत तंबाखूचा वापर करणाºया महिलांचे वजन कमी असल्याचे दाखवून दिले आहे. तसेच
उच्चशिक्षित महिलांच्या तुलनेमध्ये अशिक्षित महिलांना अ‍ॅनिमिया होण्याची शक्यता ९ पटीने अधिक आढळली.
>शिशूंचे वजन तुलनात्मकदृष्ट्या कमी
अभ्यासासाठी पुण्यामधील दोन सरकारी व दोन खासगी रुग्णालयांमधील ५९१ महिलांची निवड करण्यात आली होती. या महिलांपैकी १४० म्हणजेच २३.६९ टक्के महिलांच्या नवजात शिशूंचे वजन कमी आढळले. या अभ्यासामध्ये तंबाखूचा वापर करणाºया महिलांच्या नवजात शिशूंचे वजनही तुलनात्मकदृष्ट्या कमी आढळले.
अशा महिलांच्या भुकेवर, त्यांच्या गरोदरपणातील वजनवाढीवर तंबाखूचा परिणाम होत असावा, अशी ठळक शक्यता या अभ्यासांती व्यक्त करण्यात आली आहे. तंबाखू हा एक विषजन्य घटक आहे.
जगभरात मृत्यूस कारणीभूत असणाºया दहा मुख्य आजारांपैकी आठ आजारांमागे तंबाखूचे सेवन हे एक मुख्य कारण असू शकते, असे सर्वेक्षणामधून स्पष्ट झाले आहे. शहरातील चार रुग्णालयांमधील ५९१ महिलांपैकी १९१ महिला मशेरीच्या आहारी केल्याचे आढळून आले. या महिला अल्प उत्पन्न गटातील असून घरकाम करणाºया किंवा गृहिणी आहेत. मशेरी किंवा तंबाखूमुळे भुकेवर परिणाम होऊन जेवण कमी जाते. त्यामुळे गर्भवती असताना आवश्यक पोषक आहार मिळत नाही. परिणामी अ‍ॅनिमियाचे प्रमाण वाढते. या महिलांना डॉक्टरांनी कधीही त्यांच्या सवयीबद्दल विचारले नाही. त्यामुळे त्यांची ही सवय कमी झाली नसल्याचे दिसून आले.
- डॉ. हेमलता शेडगे, संशोधक

Web Title:  Mascheri is dangerous for healthy baby!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.