मास्क न वापरणे पडले १ हजार रुपयांना; न्यायालयाने ठोठावला वेल्डरला दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 08:07 PM2020-04-13T20:07:43+5:302020-04-13T20:09:04+5:30

शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने पोलिसांनी अनेक भागात कर्फ्यु जाहीर करुन नाकाबंदी..

The mask did not have to cost Rs 1000, court fine to welder | मास्क न वापरणे पडले १ हजार रुपयांना; न्यायालयाने ठोठावला वेल्डरला दंड

मास्क न वापरणे पडले १ हजार रुपयांना; न्यायालयाने ठोठावला वेल्डरला दंड

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ब अन्वये गुन्हा दाखल

पुणे : कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहून सरकारने मुंबई, पुणे शहरासह अनेक ठिकाणी घराबाहेर पडताना मास्क बंधनकारक केले आहे. परंतु हा आदेश न पाळणे एका वेल्डरला चांगलाच अंगाशी आला आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.महेश शांताराम धुमाळ (वय ३१, रा़ नाना पेठ) असे या वेल्डरचे नाव आहे. हीघटना कॅम्पमधील ईस्ट स्ट्रीटवरील इंदिरा गांधी चौकात ११ एप्रिलरोजीसायंकाळी साडेसहा वाजता घडली होती.शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने पोलिसांनी अनेक भागात कर्फ्यु जाहीर करुन नाकाबंदी केली आहे. तसेच ८ एप्रिलपासून घराबाहेर पडताना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. असे असताना शहरातसंचारबंदी असताना महेश धुमाळ हे बंदी आदेश मोडून मास्क न लावता  विनाकारण फिरताना आढळून आले. त्यामुळे पोलीस हवालदार गणपतराव थिकोळे यांनी लष्करपोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार धुमाळ यांच्यावर २७०, २६९, १८८,राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ब अन्वये गुन्हा दाखल केला. लष्कर पोलिसांनी ४८ तासांच्या आत लष्कर न्यायालयात दोषारोप पत्रासह धुमाळ यांना हजर केले. न्यायालयाने त्यांना १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.विनाकारण घराबाहेर पडू नका. काही कामानिमित्त घराबाहेर पडलाच तर मास्क आवश्यक घाला़ नाही तर १ हजार रुपयांना बसेलच. याशिवाय न्यायालयात जाण्यात उभे रहावे लागेल. पुढे पासपोर्ट व नोकरी मिळण्यास अड,थळा निर्माणहोईल, तो वेगळाच. त्यामुळे काळजी घ्या. घरातच रहा, असा संदेश पोलिसांनीया कारवाईतून दिला आहे़. घरातून बाहेर पडताना मास्क आवश्यक वापरा.
 

Web Title: The mask did not have to cost Rs 1000, court fine to welder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.