मास्क मुळे होणारे त्वचेचे आजार आणि उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:13 AM2021-07-14T04:13:05+5:302021-07-14T04:13:05+5:30

मास्क मुळे होणारे त्वचा विकार कोरड्या व संवेदनशील त्वचेमध्ये खाज, लालपणा, सुज येणे प्रामुख्याने दिसून येते. तेलकट त्वचेमधे Seborrheic ...

Mask skin diseases and remedies | मास्क मुळे होणारे त्वचेचे आजार आणि उपाय

मास्क मुळे होणारे त्वचेचे आजार आणि उपाय

Next

मास्क मुळे होणारे त्वचा विकार

कोरड्या व संवेदनशील त्वचेमध्ये खाज, लालपणा, सुज येणे प्रामुख्याने दिसून येते. तेलकट त्वचेमधे Seborrheic dermath's, तारुण्यपिटिका, दिसून येतात. वयस्कर लोकांमधे त्वचा लाल होणे, त्वचेवर काळे- नीळे वण येणे, खाज येणे दिसून येते.

क्वचित प्रसंगी केसांच्या मुळाशी Bacterial infection आणि बुरशीजन्य आजार दिसून येतात. जास्त वेळासाठी सुज राहिल्यास काळे डाग पडताना दिसतात.

कोणता मास्क वापरावा

मास्कचा आतला थर १००% कॉटनचा असावा. दोन मास्क वापरताना आतला मास्क कॉटनचा आणि बाहेरचा मास्क डिस्पोझेबल असेल तर उत्तम. मास्क नाकावर आण हनुवटीवर व्यवस्थित फिटिंग चा असावा. पण तो याठिकाणी घासणारा किंवा टोचणारा नसावा. आतला मास्क दर ३-४ तासांनंतर बदलावा. यामुळे त्यात वाढणारा जंतुसंसर्ग रोखता येतो. (Bacterial growth)

मास्क घालण्याआधी घ्यावयाची काळजी

मास्कचा वापर होत असताना नाकाची व तोंडाची स्वच्छता राखणे गरजेचे आहे. अन्यथा या भागातील जंतू त्वचेवर होणाऱ्या संसर्गाचे कारण ठरू शकतात. नाक diluted betadine solution ने स्वच्छा करावे. दिवसातून दोन वेळा स्वच्छ mouthwash वापरावा. नाक आणि तोंडाजवळ कुठलाही फोड आला असल्यास त्याला फोडू नये. त्वचारोगतज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यावर उपचार करावे, मास्क घालण्याआधी तैलयुक्त सौंदर्यप्रसाधने, मेकअप, पेट्रोलियम जेली वापरू नये.

कोरड्या त्वचेसाठी पुर्णपणे शोषले जाणारे moisturiser वापरावे. उग्र वास असलेली सौंदर्यप्रसाधने टाळावी. लोवेरा जेल, कॅलामाईन लोशन यांचा वापर करू शकता..

मास्क काढल्यानंतर घ्यावयाची काळजी

मास्क काढल्यानंतर अँटिबॅक्टेरियल फेसवॉशने चेहरा स्वच्छ करावा, नाक व तोंड स्वच्छ करावे. नाकामधे रात्री त्वचारोगतज्ञांच्या सल्ल्याने अँटिबायोटिक जेल लाऊ शकता. संपूर्ण त्वचेवर मॉइश्चरायझर लावावे .

काय टाळावे ?

रेटिनॉल, विविध ॲसिड असलेली औषधे सौदर्य प्रसाधने टाळावी. वारंवार वाफ घेणे टाळावे. वारंवार घासुन चेहरा धुणे टाळावे. एकदा वापरलेला मास्क न धुता पुन्हा वापरणे टाळावे.

त्वचारोगतज्ञांचा सल्ला कधी घ्यावा ?

चेहऱ्याच्या खालच्या भागात लालपणा, खाज, सुज आल्यास / नाक, ओठाजवळ आणि हनुवटीजवळ तारुण्यपिटिका किंवा फोड आल्यास कानाच्या मागे किंवा नाकपुडीशेजारी लालपणा, खाज किंवा कोंडा दिसू लागल्यास त्वचारोगतज्ञांकडून योग्य उपचार करून घ्यावेत.

डॉ. पल्लवी आहिरे-शेळके

त्वचारोगतज्ञ (स्किन एथिक्स, बाणेर)

Do' s

मधला थर १००% कॉटन

३-४ तासांनी नवा मास्क

नाक व तोंडाची स्वच्छता

Donts

तेलकट उग्र वासांची सौंदर्य प्रसाधने

नाकाजवळील ओठाजवळील फोड फोडणे

वारंवार वाफ घेणे

वारंवार चेहरा घासणे

घट्ट/ टोचणारा मास्क

Web Title: Mask skin diseases and remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.