मुखवटे चोरांना अटक, जानुबाईदेवी ट्रस्ट व ग्रामस्थांना दागिने परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:10 AM2021-06-02T04:10:05+5:302021-06-02T04:10:05+5:30
आंबाडे ता. भोर येथील जानुबाईदेवी मंदिरात झालेल्या ७ लाख रु. दागिने व प्रभावळीच्या भोर पोलीस तपास करून मुद्देमालासह ...
आंबाडे ता. भोर येथील जानुबाईदेवी मंदिरात झालेल्या ७ लाख रु. दागिने व प्रभावळीच्या भोर पोलीस तपास करून मुद्देमालासह चोरांना पकडले होते. सदरचे दागिने जानुबाईदेवी ट्रस्ट व ग्रामस्थांना अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या हस्ते परत करण्यात आले. त्यावेळी मेहिते बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, सहायक पो. नि. सांगळे श्री राजेंद्र पवार, प्रदीप खोपडे, सुभाष धुमाळ, अनिल हिप्परकर, अमोल मु-हे, विश्वनाथ जाधव आंबाडे ग्रामस्त व पोलीस उपस्थित होते.
दरम्यान, १६ मार्चला दुपारी आरोपी भोरवरून भोर- मांढरदेवी रस्त्यावरील आंबाडे गावापासून २ किलोमीटरवर असलेल्या जानुबाईदेवी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन मंदीराची रेकी करून परत गेले आणी रात्रीत मंदिराच्या दरवाजाचा कोयंडा तोडून मंदिरातील देवीचे सोन्याचांदीचे मुखवटे व प्रभावळी असा एकूण सुमारे ७ लाखांची चोरी करून दुचाकीवरून नाशिकमार्गे गुजरातला पळून गेले होते. त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन ठसे तज्ज्ञांना बोलावून बोटांचे ठसे घेण्यात आले होते. याशिवाय मोबाइल डेटा तपासून पहिला त्यात संबंधित मोबाइल क्रमांक हा सोमवारी आंबाडे गावाच्या परिसरात कार्यरत असल्याचे लक्षात आले होते.
दरम्यान भोर पोलिसांनी गुजरात पोलिसांना मोबाइलवरून संर्पक साधून चोरीबाबत माहिती दिल्यावर गुजरात बाॅर्डरवर गुजरात पोलिसांनी वरील दोन्ही चोरांना मुद्देमालासह अटक करून भोर पोलिसांच्या ताब्यात दिले. भोर पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करून आज भोर येथील न्यायालयात हजर केले होते. त्यामुळे २४ तासांत भोर पोलिसांनी मुखवटे चोरांना अटक करून सर्व मुद्देमाल परत मिळवल्याबददल भोर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आंबाडे, ता. भोर येथील जानुबाईदेवी मंदिरातील चोरी झालेले मुखवटे प्रभावळी आंबाडे ग्रामस्थांना परत करताना अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, प्रवीण मोरे व प्रदीप खोपडे चोरासह पो. नि. प्रवीण मोरे व इतर फोटो.