आंबाडे येथीलमुखवटे चोरांना २४ तासात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:11 AM2021-03-21T04:11:28+5:302021-03-21T04:11:28+5:30

धर्मा उर्फ धर्मेश शंकरलाल राव (वय २९ ,रा साईधाम सोसायटी व वरेती कडोदरा सुरत) व प्रवीण सिंग छगन सिंग ...

Masked thieves from Ambade arrested in 24 hours | आंबाडे येथीलमुखवटे चोरांना २४ तासात अटक

आंबाडे येथीलमुखवटे चोरांना २४ तासात अटक

Next

धर्मा उर्फ धर्मेश शंकरलाल राव (वय २९ ,रा साईधाम सोसायटी व वरेती कडोदरा सुरत) व प्रवीण सिंग छगन सिंग राजपूत (वय ३० रा साई धाम सोसायटी सुरत) यांना अटक करुन पोलीस कोठडी दिली आहे.

भोर पोलीसांनी दिलेली माहिती अशी कि सोमवारी दुपारी वरील दोन्ही आरोपी भोरवरुन भोर- मांढरदेवी रस्त्यावरील आंबाडे गावापासुन २ किलोमीटरवर असलेल्या जानुबाईदेवी मंदीरात जाऊन दर्शन घेऊन मंदीराची रेकी करुन परत गेले आणी राञीत मंदीराच्या दरवाजाचा कोयंडा तोडुन मंदीरातील देवीचे सोन्या चांदीचे मुखवटे व प्रभावळी असा एकुण सुमारे ७ लाखाची चोरी करुन दुचाकीवरुन नाशिक मार्गे गुजरातला पळुन गेले होते.त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन ठसे तज्ञांना बोलावुन बोटांचे ठसे घेण्यात आले होते.याशिवाय मोबाईल डेटा तपासुन पहिला त्यात संबंधित मोबाइल क्रमांक हा सोमवारी आंबाडे गावाच्या परिसरात कार्यरत असल्याचे लक्षात आले होते.

दरम्यान ,भोर पोलीसांनी गुजरात पोलीसांना मोबाइलवरुन संर्पक साधुन चोरीबाबत माहिती दिल्यावर गुजरात बाँर्डरवर गुजरात पोलीसांनी वरील दोन्ही चोरांना मुददेमालासह अटक करुन भोर पोलीसांच्या ताब्यात दिलेसदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस आधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविण मोरे,उपनिरीक्षक राजेंद्र पवार,जमादार सुभाष गिरे,शिवाजी काटे,पंकज मोघे,अमोल मु-हे,अनिल हिप्परकर,प्रमिला निकम,दामिनी दाभाडे,सुनिल चव्हाण,राहुल मखरे मंगेश सुर्वे,श्री भिसे व गुजरात पोलीस उपनिरीक्षक श्री पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.

आंबाडे ता भोर येथील जानुबाईदेवी मंदीरातील मुखवटे चोरासह पो,नि प्रविण मोरे व इतर फोटो

Web Title: Masked thieves from Ambade arrested in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.