पुरंदरमध्ये मासूम संस्थेचे ‘शेत दोघांचे’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:08 AM2021-06-20T04:08:33+5:302021-06-20T04:08:33+5:30

समाजात व कुटुंबामध्ये स्त्रियांना शेतकरी म्हणून मान्यता मिळावी, शेतीच्या योजनांचा लाभ मिळावा, तसेच स्त्रियांचा सन्मान वाढावा, यासाठी महिला ...

Masoom Sanstha's 'Shet Doghanche' campaign in Purandar | पुरंदरमध्ये मासूम संस्थेचे ‘शेत दोघांचे’ अभियान

पुरंदरमध्ये मासूम संस्थेचे ‘शेत दोघांचे’ अभियान

googlenewsNext

समाजात व कुटुंबामध्ये स्त्रियांना शेतकरी म्हणून मान्यता मिळावी, शेतीच्या योजनांचा लाभ मिळावा, तसेच स्त्रियांचा सन्मान वाढावा, यासाठी महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ मासूम संस्था महिलांचे नाव शेतीवर लावण्यासाठी काम करत आहे. मागील दोन वर्षांपासून गावांमध्ये जाणीवजागृती करून महिला व पुरुषांबरोबर चर्चा करून महिलांची नावे शेतीवर लावण्यासाठी प्रयत्न करत आहे. पुरंदर तालुक्यातील काही गावांमधून तहसील कार्यालयात अंदाजे १०० अर्ज लक्ष्मीमुक्ती योजनेचे दाखल केले आहेत. महिलांचे नाव सह-हिस्सेदार म्हणून लावण्यासाठी मासूमचे कार्यकर्ते मार्गदर्शन व मदत करत आहेत. या अभियानात समाज, कुटुंब व शासकीय यंत्रणा या सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले तर महिलांना संपत्तीत हक्क प्रस्थापित होण्यासाठी मदत होईल होईल. तसेच पुरंदर तालुका एक रोल मॉडेल होईल. सर्वांनी या अभियानात सहभागी होऊन आपल्या पत्नीचे व घरातील महिलांचे भविष्य सुरक्षित करू यात. शेतीवर नाव लागल्याने महिला व कुटुंबाला फायदाच होणार आहे. शासकीय योजनांचा फायदा महिलांना सवलतीमध्ये मिळत आहे. शेतीसाठी कोणतेही अवजार खरेदी करायचे असल्यास जर महिलेच्या नावावर शेती असल्यास ६०% अनुदान मिळते. महिलेच्या नावावर ट्रॅक्टर खरेदी केला तर पुरुषांपेक्षा १०% अनुदान महिलेला जास्त मिळते.

महिलेच्या नावावर शेती असल्यास बियाणे, खत यांचा लाभ मिळतो. फळबाग लागवड, ठिबक सिंचन, शेततळे, यासाठी लाभ घेऊ शकतो. राष्ट्रीयीकृत बँकांकडून बिनव्याजी पीककर्ज मिळते. शेतीसाठी विद्युत मोटर, पीव्हीसी पाईप यांच्यासाठी अनुदान मिळते

लक्ष्मीमुक्ती योजनेद्वारे सातबाऱ्यावर पतीच्या नावाबरोबर सह-हिस्सेदार म्हणून पत्नीचे नाव लावण्याचे आवाहन मासूमच्या सहसंयोजक जयश्री नलगे, मीना शेंडकर यांनी केले आहे.

लक्ष्मीमुक्ती योजनेद्वारे शेत दोघांचे अभियान राबवताना मासूम संस्थेचे पदाधिकारी.

Web Title: Masoom Sanstha's 'Shet Doghanche' campaign in Purandar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.