हिंजवडीमध्ये दोन दुकानांना भीषण आग, मोठे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 09:55 AM2020-03-06T09:55:26+5:302020-03-06T09:57:41+5:30
पीआरडीएमए अग्निशामक केंद्रातील जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
धनकवडी - हिंजवडीजवळील मारुंजी गावातील ग्रामपंचायतीच्या बाजूला असलेल्या फ्लेवर्स चायनीज व शेजारीच असलेल्या आधेश्वर शिट कव्हर या दोन दुकानांना भीषण आग लागली आहे. शुक्रवारी रात्री दोन वाजता ही घटना घटली. पीआरडीएमए अग्निशामक केंद्रातील जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
पीएमआरडीए अग्निशामक केंद्रातील उपस्थानक अधिकारी विजय महाजन यांनी सांगितले की मारुंजी गावात रात्री दोन वाजता शीट कव्हरच्या दुकानाला आग लागली. ही आग पसरत जाऊन शेजारी असलेल्या चायनीज दुकानापर्यंत गेली. मात्र अग्निशामक केंद्रातील जवानांनी घटनास्थळी जाऊन चायनीज शॉपमधील तीन सिलिंडर आगी धून बाहेर काढले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि शर्थीच्या प्रयत्नानंतर बाजूला असलेल्या सात ते आठ दुकानांना आगीपासून संरक्षण देण्यात यश आणि आगीवर नियंत्रण मिळवले त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
अग्निशामक केंद्रातील उपस्थानक अधिकारी विजय महाजन, फायरम संदीप शेळके, हितेश आहेर, राहुल शिरोळे, संदीप तांबे, प्रकाश मदने, सुरज इंगवले, अक्षय काळे, योगेश मायनाळे, वैभव कोरडे, विकास गायकवाड, मयूर गोसावी यांनी ही कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
China Coronavirus : 'सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांची कोरोना तपासणी करा'
८0 देशांत कोरोना; भारतात ३0 रुग्ण; अनेक कार्यक्रम रद्द
एकही मंत्री कामाचा नाही, हे तर भ्रष्ट सरकार; काँग्रेस आमदाराचा राजीनामा
महाविकास आघाडी सरकारच्या विविध मंत्र्यांनी १०० दिवसांत घेतलेले महत्त्वाचे निर्णय
राज्याचा विकासदर घटला, बेरोेजगारीत दीड लाखांची वाढ