पुण्यात रंगली ‘मॅसिव्ह व्हाईब’ मैफल; आंतरराष्ट्रीय म्युझिक ग्रुपतर्फे ओशो रिसॉर्टमध्ये सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:00 PM2018-01-31T12:00:48+5:302018-01-31T12:04:16+5:30

ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट येथे ‘मॅसिव्ह व्हाईब’ या आंतरराष्ट्रीय म्युझिक ग्रुपचा बहारदार कार्यक्रम झाला. क्वीन बी या अमेरिकन महिलेने काव्य-संगीत-नृत्याच्या माध्यमातून विश्वशांतीसाठी सुरू केलेल्या अभिनव मोहिमेचा भाग म्हणून ही मैफल सादर करण्यात आली.

'Massive Wibe' celebrated in Pune; Presented by the International Music Group at the Osho Resort | पुण्यात रंगली ‘मॅसिव्ह व्हाईब’ मैफल; आंतरराष्ट्रीय म्युझिक ग्रुपतर्फे ओशो रिसॉर्टमध्ये सादरीकरण

पुण्यात रंगली ‘मॅसिव्ह व्हाईब’ मैफल; आंतरराष्ट्रीय म्युझिक ग्रुपतर्फे ओशो रिसॉर्टमध्ये सादरीकरण

googlenewsNext
ठळक मुद्देकाव्य-संगीत-नृत्याद्वारे जगातील दुष्कृत्यांबाबात जनजागृतीट्रम्पेट, चेलो, हार्मोनिका, की बोर्ड या वाद्यवृंदांबरोबर व गायनाद्वारे पोहोचवला संदेश

पुणे : ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट येथे ‘मॅसिव्ह व्हाईब’ या आंतरराष्ट्रीय म्युझिक ग्रुपचा बहारदार कार्यक्रम झाला. क्वीन बी या अमेरिकन महिलेने काव्य-संगीत-नृत्याच्या माध्यमातून विश्वशांतीसाठी सुरू केलेल्या अभिनव मोहिमेचा भाग म्हणून ही मैफल सादर करण्यात आली. 
शासन-प्रशासन किंवा अन्य संस्थांची वाट न पाहता प्रत्येकाने स्वत:मध्ये बदल घडवून आणावा. काव्य-संगीत-नृत्याद्वारे जगातील दुष्कृत्यांबाबात जनजागृती करण्यासाठी जगभर या मैफली आयोजित केल्या जातात. त्यासाठी या ग्रुपच्या तरुण कलावंतांनी जागतिक दौरा सुरू केला आहे. ट्रम्पेट, चेलो, हार्मोनिका, की बोर्ड या वाद्यवृंदांबरोबर व गायनाद्वारे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे हा संदेश रसिकांपर्यंत पोहोचवला. ‘शक्ती बनो’ हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. या मैफलीत गरीबी, पर्यावरणाची हानी, युद्ध, दहशतवाद इत्यादी दुर्घटनांची छायाचित्रे दाखवून हे दुष्प्रकार थांबवण्याचे आवाहन संगीत-नृत्याद्वारे केले गेले. ओशो मेडिटेशन रिसॉर्ट येथील सुमारे ४० देशांतून आलेल्या रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Web Title: 'Massive Wibe' celebrated in Pune; Presented by the International Music Group at the Osho Resort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे