पुण्यात मास्टरस्ट्रोक कॅरम अकादमी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:15 AM2021-08-17T04:15:35+5:302021-08-17T04:15:35+5:30

ते म्हणाले की, पूर्वी दळणवळणाची यंत्रणा आतासारखी नव्हती, तसेच मुंबईसारख्या दमट हवामान असलेल्या ठिकाणीसुद्धा अल्प सुखसुविधा असलेल्या क्रीडा संस्थांमधून ...

Masterstroke Carrom Academy started in Pune | पुण्यात मास्टरस्ट्रोक कॅरम अकादमी सुरू

पुण्यात मास्टरस्ट्रोक कॅरम अकादमी सुरू

Next

ते म्हणाले की, पूर्वी दळणवळणाची यंत्रणा आतासारखी नव्हती, तसेच मुंबईसारख्या दमट हवामान असलेल्या ठिकाणीसुद्धा अल्प सुखसुविधा असलेल्या क्रीडा संस्थांमधून आम्ही तासनतास सराव करायचो. आता परिस्थिती बदलली आहे. एकाग्रता वाढवणाऱ्या या खेळात चांगले खेळाडू तयार झाले पाहिजेत. पूर्वी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ‘वॉर्म अप’साठी स्पर्धकांना पुरेसा वेळ दिला जात होता. त्यामुळे मानसिक तयारी व्हायची आणि स्पर्धेसाठी तग धरण्याची क्षमता वाढण्यास मदत व्हायची. आता सर्व कॅरम स्पर्धांमध्ये स्पर्धकांना थेट उतरवले जाते त्यांना स्पर्धेपूर्वी कमीत कमी दोन बोर्ड खेळू दिले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या वेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व हवेली तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन घुले, राष्ट्रीय कॅरम खेळाडू मेधा मिटकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रकाश गायकवाड, आंतरराष्ट्रीय खेळाडू अनिल मुंढे, आंतरराष्ट्रीय खेळाडू अभिजित त्रिपणकर, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सदस्य आशुतोष धोडमिसे, क्षितिज घुले, आयसीएफ कप फेडरेशन पॅनल पंच संदीप अडागळे, राष्ट्रीय बॉक्सिंग पंच व क्रीडापटू वैशाली चिपलकट्टी, पुणे मनपा कॅरम संघ व्यवस्थापक माऊली पाटोळे, अकादमीचे संचालक आणि उपसंचालिका गणेश अडागळे आणि आशा भोसले उपस्थित होते.

फोटो - कॅरम

Web Title: Masterstroke Carrom Academy started in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.