पुण्यात मातंग समाजाचा विराट मूकमोर्चा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 04:24 PM2018-07-21T16:24:00+5:302018-07-21T16:24:54+5:30
राज्यातील मातंग समाजाच्या अन्याय अत्याचारांमध्ये वाढ होत असल्याच्या कारणावरून पुणे शहरात आज मातंग समाजाच्यावतीने विराट मोर्चा काढण्यात आला.
पुणे : राज्यातील मातंग समाजाच्या अन्याय अत्याचारांमध्ये वाढ होत असल्याच्या कारणावरून पुणे शहरात आज मातंग समाजाच्यावतीने विराट मोर्चा काढण्यात आला. सारसबागेच्या जवळील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. संविधान उद्देशिका वाचनाने मोर्चाची सुरवात झाली . मूकपणे काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मातंग समाज बांधव सहभागी झाले होते.
या मोर्चातही मराठा मोर्चाप्रमाणे महिला अग्रस्थानी होत्या. स्वारगेट ते जिल्हाधिकारी कार्यलयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चासाठी वाहतूक मार्गांमध्ये काही बदल करण्यात आले होते. मोर्चासमोर कोणताही अडथळा येऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पुणे शहर आणि जिल्ह्यासह मातंग समाजातील विविध मान्यवर मोर्चात सहभागी झाले होते. प्रातिनिधिक स्वरूपात जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोर्च्याची सांगता करण्यात आली.