लोकमत विमेन समिट २०१८: उषा मडावी यांना मातोश्री वीणादेवी दर्डा जीवनगौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 01:23 AM2018-10-26T01:23:51+5:302018-10-26T01:24:06+5:30

विधायक पत्रकारितेचा वसा जपताना समाजातील मांगल्याला, सेवाभावाला वृद्धिंगत करण्यासाठी संघर्षमय आयुष्यातून उत्तुंग कर्तृत्व गाजविणाऱ्या महिलांचा ‘लोकमत वुमेन समीट’मध्ये गौरव होणार आहे.

Matoshree Veena Devi Darda Lifetime Achievement Award by Usha Madavi in Lokmat Women Summit 2018 | लोकमत विमेन समिट २०१८: उषा मडावी यांना मातोश्री वीणादेवी दर्डा जीवनगौरव

लोकमत विमेन समिट २०१८: उषा मडावी यांना मातोश्री वीणादेवी दर्डा जीवनगौरव

Next

पुणे : विधायक पत्रकारितेचा वसा जपताना समाजातील मांगल्याला, सेवाभावाला वृद्धिंगत करण्यासाठी संघर्षमय आयुष्यातून उत्तुंग कर्तृत्व गाजविणाऱ्या महिलांचा ‘लोकमत विमेन समिट २०१८’मध्ये गौरव होणार आहे.
वनसंपदेला वाचविण्यासाठी संघर्ष करणाºया ‘फॉरेस्ट वुमन’ उषा मडावी यांना मातोश्री वीणा दर्डा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. स्वत:च्या अपंगत्वावर मात करताना इतरही अपंग मुलींमध्ये जिद्दीचे बळ निर्माण करणाºया मीनाक्षी देशपांडे यांना सौ. ज्योत्स्ना दर्डा कार्यगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी केली.
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने देशपातळीवर होत असलेल्या कार्याला व्यासपीठ मिळवून देताना आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजापुढे दीपस्तंभ असणाºयांचा गौरव ‘लोकमत’च्या वतीने करण्यात येणार आहे. दर्डा म्हणाले, ‘‘लोकमतचे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांनी मूल्ये आणि तत्त्वांचा जागर करीत समाजहितैषी परिवर्तनाच्या
भूमिकेचा पुरस्कार केला आहे. याच भूमिकेतून हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.’’
उषा मडावी यांनी मोठा संघर्ष उभारून सुमारे ७०० एकरांचे जंगल वाचविले आहे. जंगल तस्करी रोखण्यासाठी, तस्करांना अडवण्यासाठी महिलांना एकत्र केले.
लहानपणीच पोलिओ झाल्याने अपंगत्व आलेल्या मीनाक्षी देशपांडे यांनी जिद्दीने शिक्षण पूर्ण केले. बॅँकेत नोकरी मिळविली; पण आपल्यासारख्याच अपंग मुलींनाही चांगले जीवन मिळावे, यासाठी हॅँडीकॅप असोसिएशनची स्थापना केली. मुलींसाठी निवासी प्रकल्प उभारला. विविध कौशल्ये देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले. क्रीडाक्षेत्रात प्रोत्साहन दिले. त्यांच्या तीन विद्यार्थिनींना शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे.
>लोकमत सखी सन्मान राज्यस्तरीय पुरस्कारांचे होणार वितरण
लोकमतच्या वतीने राज्यपातळीवर लोकमत सखी सन्मान पुरस्कारांचे वितरणही या वेळी होणार आहे. यंदाच्या वर्षीचे पुरस्कारार्थी असे :
शैक्षणिक - मंजुश्री पाटील (मुंबई ), सांस्कृतिक -गौरी गाडगीळ (पुणे),
सामाजिक - डॉ. सुधा कांकरिया (नगर), क्रीडा -अंकिता गुंड (पुणे),
व्यावसायिक -निराली जैन (नागपूर), शौर्य -जुलिअना लोहार (गोवा),

Web Title: Matoshree Veena Devi Darda Lifetime Achievement Award by Usha Madavi in Lokmat Women Summit 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.