पुण्यातील हौशी कार्यकर्त्यांचे मोहोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 02:34 AM2018-08-27T02:34:44+5:302018-08-27T02:35:08+5:30

वारजेतील रुणवाल पॅनोरमा : नव्या व्यवस्थापन समितीची विविध उपक्रमांची सुरुवात

Mauhal of the Housing Society of Pune | पुण्यातील हौशी कार्यकर्त्यांचे मोहोळ

पुण्यातील हौशी कार्यकर्त्यांचे मोहोळ

Next

पुणे : वारजे परिसरातील पुणे-बंगळुरू महामार्गालगत असलेली नागरी शिस्तीचा आदर्श घालून देणारी सोसायटी म्हणजे रुणवाल पॅनोरमा सोसायटी होय. सोसायटीची स्थापन २००१ मध्ये करण्यात आली. सोसायटी अंतर्गत ११४ सदनिका आहेत. सोसायटीच्या नव्या व्यवस्थापकीय समितीच्या मार्गदर्शनातून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. या व्यवस्थापकीय समितीत राजेंद्र ढमाले (अध्यक्ष), सचिन लोखंडे (सचिव), किरण ढोमसे (खजिनदार), सत्तार पटवे, सुरेश नागपुरे आदी सभासदांचा सहभाग आहे.

सांस्कृतिक
सोसायटीमध्ये वर्षभर सर्व सण उत्सव जल्लोषात साजरे केले जातात. यामध्ये गणेशोत्सव, होळी, दहीहंडी, दिवाळीतील दीपोत्सव इत्यादी उत्सव साजरे केले जातात. सण-समारंभाच्या निमित्ताने सभासदांचे एकत्रीकरण घडून येते. या दरम्यान तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व सभासद आनंदाने सहभागी होतात.

सुरक्षा

सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीच्या पुढाकारातून परिसरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे सभासदांच्या मालमत्तेच्या सुरक्षेत वाढ झाली आहे. अनोळखी व्यक्तींच्या हालचाली टिपता येतात. सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांचीही परिसरात करडी नजर असते.

पाणी
सभासदांकडून पालिकेकडून होणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्यात येते. सोसायटीच्या परिसरात पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता सोसायटीतील सभासद घेत असतात. सोसायटीत एक कूपनलिका आहे. कूपनलिकेच्या पाण्याचा वापर सोसायटीतील वृक्ष रोपांच्या संवर्धनासाठी तसेच इतर कामासाठी करण्यात येतो.

कचरा
शहरातील लोकसंख्या पाहता प्रत्येक नागरिकाने स्वयंशिस्तीने कचºयाचे व्यवस्थापन करने क्रमप्राप्त ठरते. त्यामुळेच सोसायटीतील सभासद परिसरात कुठेही कचरा होणार नाही. याची दक्षता घेतात. त्यामुळे परिसर स्वच्छ राहतो. सर्व सभासद ओल्या आणि सुक्या कचºयाचे व्यवस्थित वर्गीकरण करुन स्वच्छता कर्मचाºयांकडे देतात.

वृक्षारोपण
४सोसायटीच्या आवारात फणस, कडुनिंब, पारिजातक, वड अशी आपल्या हवामानाला पूरक अशी झाडे लावण्यात आली आहेत. त्यामुळे सोसायटीतील हवा शुद्ध राहते. सभासदांकडून परिसरातील वृक्ष-रोपांची निगा राखली जाते.

सामाजिक />सोसायटी पुणे-बंगळुरू महामार्गाजवळच असल्याने महामार्गावरील अपात्कालीन परिस्थितीत, तसेच अपघातावेळी सभासद धावून जातात व अपघातग्रस्तांना मदत करतात.
सोसायटीतील अनेक सभासद वैयक्तिक पातळीवर अनेक
सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात. सोसायटीतील उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी, तसेच इतर कामांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींचे विशेष सहकार्य लाभत असते.

वीजबचत
व्यवस्थापकीय समितीने सोसायटीच्या सामाईक परिसरातील जुन्या
दिव्यांचा वापर थांबवून एलईडी दिवे बसविण्यात आले आहे. त्यामुळे वीजबचत होत आहे.

Web Title: Mauhal of the Housing Society of Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.