अश्लील चाळे करणाऱ्या मौलानाचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 02:43 AM2018-08-29T02:43:16+5:302018-08-29T02:43:41+5:30
अनाथ आश्रमातील मुलांशी अश्लील चाळे करणाºया मौलानाचा जामीन विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी फेटाळला. हाफिज अब्दुल
पुणे : अनाथ आश्रमातील मुलांशी अश्लील चाळे करणाºया मौलानाचा जामीन विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी फेटाळला. हाफिज अब्दुल रहिम गुलाब रब्बानी शेख (वय २१, रा. रहिटोला, पो. छातीयौना, बिहार) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी दहा वर्षाच्या पीडित मुलांच्याकडे विचारपूस केल्यानंतर बालहक्क आणि सामाजिक कार्यकर्ता डॉ. यामिनी अद्वैत अडबे (वय ५४, रा. बाणेर) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही घटना २४ जुलै २०१८ रोजी उघड झाली होती.
‘साथी’ संस्थेतील कार्यकर्त्यांना पुणे रेल्वे स्टेशन परिसरात १० वर्षांची दोन मुले संशयितरित्या फिरताना आढळली होती. त्या दोन मुलांना बालकल्याण समिती शिवाजीनगर येथे आणण्यात आले. त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्यांनी आम्ही कात्रज येथील अनाथ आश्रमातून पळून आल्याचे सांगितले. दोघांना याबाबत कारण विचारले असता, मागील १५ दिवसांपासून आम्ही गोकूळनगर येथील अनाथ आश्रमातील (यतीमखान्यातील) असल्याचे सांगितले. तसेच मौलाना बालकांवर लैंगिक अत्याचार करतो. तसेच त्याचे न ऐकल्यास काठीने मारहाण करत असल्याचे सांगितले. त्याच्या या त्रासाला कंटाळून आम्ही पळून आल्याची माहिती संबंधित मुलांनी दिली. त्याबाबत बालकल्याण समितीने व्हिडीओ रेकॉर्डिंग करून या प्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात मौलानाला २७ जुलै रोजी अटक झाली. सुरुवातीला त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. मौलानाने जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता.