मंचरला महामार्गाने घेतला मोकळा श्वास, : ३५० अडथळे हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 03:00 AM2018-03-08T03:00:43+5:302018-03-08T03:00:43+5:30

पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या मंचर शहरातील ३५० अतिक्रमणांवर बुधवारी हातोडा पडला. जेसीबी व गॅसकटरच्या साह्याने ही अतिक्रमणे काढून टाकण्यात आली. पहाटे साडेपाचला सुरू झालेली कारवाई उशिरापर्यंत सुरू होती. प्रवाशांनी व वाहनचालकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.

 Maulatra took the highway, breathed freely: 350 bumps removed | मंचरला महामार्गाने घेतला मोकळा श्वास, : ३५० अडथळे हटविले

मंचरला महामार्गाने घेतला मोकळा श्वास, : ३५० अडथळे हटविले

Next

मंचर - पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या मंचर शहरातील ३५० अतिक्रमणांवर बुधवारी हातोडा पडला. जेसीबी व गॅसकटरच्या साह्याने ही अतिक्रमणे काढून टाकण्यात आली. पहाटे साडेपाचला सुरू झालेली कारवाई उशिरापर्यंत सुरू होती. प्रवाशांनी व वाहनचालकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.
अतिक्रमणाविरोधी सर्वांत मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मंचर ग्रामपंचायत, प्रांताधिकारी कार्यालय व राष्ट्रीय महामार्ग विभागाने सयुक्तपणे मोहीम राबविली.
पुणे-नाशिक महामार्ग मंचर शहरातून गेला आहे. महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली होती. त्याचा अडथळा वाहनांना प्रवास करताना होत होता. स्थायी व अस्थायी फ्लेक्स बोर्डांमुळे रस्त्याचे विद्रुपीकरण झाले होते. अपघात होऊ लागले होते. प्रशासनाने ३५० अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या होत्या. अतिक्रमण काढून घेण्यास सांगण्यात आले होते. काही व्यावसायिकांनी ते काढून घेतले होते.
नंदकुमार पेट्रोल पंप ते
जीवन हॉटेलपर्यंत असणाºया अतिक्रमणधारकांना नोटिसा गेल्या होत्या. विशेष म्हणजे महामार्गालगत इमारत बांधताना त्या योग्य अंतर राखून बांधण्यात आल्याने अतिक्रमणात आल्या नाहीत.
पहाटे साडेपाच वाजता नंदकुमार पेट्रोल पंपापासून कारवाईला सुरुवात झाली. रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणे व फलक काढून टाकण्यात आले. सरपंच दत्ता गांजाळे यांनी अतिक्रमणे काढण्यासाठी विशेष पुढाकार घेतला होता.
दोन जेसीबी व तीन ट्रॅक्टरच्या साह्याने अतिक्रमण काढण्यात आले. दोन गॅस कटरच्या साह्याने फलक कापून काढून ते लगेच बाहेर पाठविण्यात आले. ग्रामपंचायतीचे ५० कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. सरपंच गांजाळे यांच्यासह पोलीस निरीक्षक प्रकाश धस, फौजदार बंडोपत घाटगे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. १० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते.
प्रांताधिकारी अजित देशमुख, तहसीलदार रवींद्र सबनीस,
राष्ट्रीय महामार्ग अ‍ॅथॉरिटीचे अनिलकुमार मिश्रा यांनी कारवाई सुरू झाल्यानंतर भेट दिली. अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू झाल्यानंतर अनेक व्यावसायिकांनी त्यांची अतिक्रमणे स्वत:हून काढून घेतली. अतिक्रमणाच्या कारवाईला कोणीही विरोध केला नाही. एसटी बसस्थानकातील मोठे फलक जेसीबीच्या साह्याने काढण्यात
आले आहे.
मोरडेवाडी रस्ता येथील भिंत पाडण्यात आली. सायंकाळपर्यंत ही अतिक्रमणाची कारवाई सुरू होती. उपसरपंच महेश थोरात, ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे व सर्व ग्रामपंचायत सदस्य कारवाईच्या वेळी हजर होते.

बसस्थानकाने घेतला मोकळा श्वास

मंचर एसटी बसस्थानकात सर्वाधिक अतिक्रमण झाले होते. पुणे-नाशिक महामार्गालगत असणाºया भिंतीलगत ओळीने टपºया उभ्या होत्या. प्रवेशद्वारावरदुतर्फा फळविक्रेते बसलेले होते. आतील आवारात छोट्या-मोठ्या फलकांनी जागा व्यापली होती. ही सर्वच अतिक्रमणे आज काढण्यात आल्याने बसस्थानकाने मोकळा श्वास घेतला आहे. बसस्थानकालगतच्या टपºया रातोरात निघाल्या. ती जागा सकाळीच रिकामी झाली होती. मोठे फ्लेक्स व लोखंडी फलक जेसीबीच्या साह्याने काढून टाकण्यात आली. बसस्थानकाचा आवार रिकामा झाला असून दूरवरून बसस्थानकातील एसटी बस दिसू लागल्या आहेत.

महामार्गावरील अतिक्रमणे काढण्याची मंचर शहरातील ही सर्वांत मोठी कारवाई झाली आहे. या कारवाईचे वाहनचालक व प्रवाशांनी स्वागत केले आहे. ग्रामपंचायतीच्या धडक कारवाईबाबत अनेक जण समाधान व्यक्त करत होते. विशेष म्हणजे अतिक्रमण काढताना कुठलाही विरोध झाला नाही. मंचर एसटी बसस्थानकासमोर पोलीस मदत केंद्र आहे. हे केंद्र अतिक्रमणात येत असल्याने ते काढण्याची कारवाई सुरू झाली होती. अतिक्रमण काढताना कोणालाही सूट देण्यात आली नाही.

दुसरा टप्पा मंचर-घोडेगाव रस्ता
४दरम्यान,पुणे-नाशिक महामार्गालगतची अतिक्रमणे काढली आहेत. आता
मंचर-घोडेगाव रस्त्यालगतची अतिक्रमणे काढली जाणार आहेत.
४नोटिसा संबंधितांना पाठविण्यात आाल्या आहेत. अतिक्रमणे काढण्याची कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती सरपंच दत्ता गांजाळे यांनी दिली.

Web Title:  Maulatra took the highway, breathed freely: 350 bumps removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.