माऊली जमदाडेने मारले कुस्ती मैदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 02:34 AM2018-05-08T02:34:57+5:302018-05-08T02:34:57+5:30

कळंब (ता. इंदापूर) येथे पार पडलेल्या पुरुषांच्या प्रथम क्रमांकाच्या कुस्तीमध्ये पंजाबचा मनजितसिंह खत्री व कोल्हापूरचा माऊली जमदाडे यांच्यात १२ मिनिटे चुरशीची व रंगतदार लढत झाली. यामध्ये जमदाडेने खत्री याला बॅकसालतो डावावर आसमान दाखवले.

 Mauli Jamaday win | माऊली जमदाडेने मारले कुस्ती मैदान

माऊली जमदाडेने मारले कुस्ती मैदान

Next

लासुर्णे : कळंब (ता. इंदापूर) येथे पार पडलेल्या पुरुषांच्या प्रथम क्रमांकाच्या कुस्तीमध्ये पंजाबचा मनजितसिंह खत्री व कोल्हापूरचा माऊली जमदाडे यांच्यात १२ मिनिटे चुरशीची व रंगतदार लढत झाली. यामध्ये जमदाडेने खत्री याला बॅकसालतो डावावर आसमान दाखवले. त्याने या डावावर प्रथम क्रमांकाची कुस्ती जिंकली.
कळंब (ता. इंदापूर) येथील फडतरे उद्योग समूहाच्या वतीने स्व. बाबासाहेब फडतरे यांच्या नवव्या पुण्यस्मरणानिमित्त कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते. या वेळी कोल्हापूरच्या योगेश बोंबाळेने दिल्लीच्या अमितकुमारला घिस्सा डावावर चितपट केले. कार्तिक काटे याने पोपट घोडकेला बँकसालतो डावावर धूळ चारली. कौतुक दाफळे याने मोळी डावावर विजय धुमाळचा विजय खेचून आणला. कुर्डूवाडीच्या सुनील शेवतकरने सवारी करून दिल्लीच्या सिकंदरला चितपट केले. कळंबचा ५ मेचा आखाडा प्रसिद्ध असल्याने या मैदानात सहभागी झालेल्या मल्लांनी डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या कुस्त्या खेळल्या. या आखाड्यासाठी दिल्ली, पंजाब, हरियाणा तर महाराष्ट्रातून सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर आदी भागांतून नामवंत मल्ल आले होते.
या वेळी माढ्याचे आमदार बबन शिंदे, प्रशांत परिचारक, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय नाईक निंबाळकर, बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, प्रताप पाटील, मल्लसम्राट रावसाहेब मगर, नारायण देवकर, मधुकर पाटील आदी उपस्थित होते.
या मैदानाचे आयोजन फडतरे उद्योग समूहाचे अध्यक्ष उत्तम फडतरे, बाजार समिती संचालक दत्तात्रेय फडतरे, हनुमंत फडतरे, मंगेश फडतरे यांनी केले. कुस्ती समालोचन शंकर पुजारी व प्रशांत भागवत यांनी केले.

Web Title:  Mauli Jamaday win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.