Ashadhi Wari 2023: माऊलींच्या रथाचा मान यंदा 'सोन्या - मोन्या' बैलजोडीला; येत्या ११ जूनला विठुरायाच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 01:38 PM2023-05-08T13:38:01+5:302023-05-08T13:38:37+5:30

माऊलींच्या पालखी प्रस्थानाला एक महिना अवकाश असल्याने मानकऱ्यांकडून बैलांचा दम वाढविण्यासाठी चालण्याची प्रात्याक्षिके घेतली जाणार

Mauli's chariot is honored this year by Sonya Monya bullock pair Visiting Vithuraya on June 11 | Ashadhi Wari 2023: माऊलींच्या रथाचा मान यंदा 'सोन्या - मोन्या' बैलजोडीला; येत्या ११ जूनला विठुरायाच्या भेटीला

Ashadhi Wari 2023: माऊलींच्या रथाचा मान यंदा 'सोन्या - मोन्या' बैलजोडीला; येत्या ११ जूनला विठुरायाच्या भेटीला

googlenewsNext

आळंदी : श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी सोहळा रथासाठी निवड झालेल्या मानकऱ्यांनी  बैलजोडी खरेदी केली असून ‘सोन्या -मोन्या’ ही बैलजोडी आळंदीत दाखल झाली आहे. यंदा माऊलींच्या पालखी सोहळ्यातील रथाला आळंदीतील तुळशीराम भोसले व रोहित भोसले यांच्या बैलजोडीला मान मिळालेला आहे. माउलींच्या पालखी प्रस्थानाला एक महिना अवकाश असल्याने मानकऱ्यांकडून बैलांचा दम वाढविण्यासाठी चालण्याची प्रात्याक्षिके घेतली जाणार आहेत.    
             
माऊलींचा आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळा येत्या ११ जुनला अलंकापुरीतून पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. यापार्श्वभूमीवर भोसले कुटुंबीयांनी कर्नाटक राज्यातील राजापूर (ता. निपाणी) गावातील राजु गिरी यांच्याकडून ४ लाख रुपयांना 'सोन्या - मोन्याची' बैलजोडी विकत घेतली आहे. रविवारी (दि.७) ही मानाची बैलजोडी आळंदीत दाखल झाली. त्यानंतर सुवासिनींच्या हस्ते बैलांना औक्षण करून पूजा करण्यात आली. 

 दरम्यान बैलांच्या रोजच्या आहारात कडबा, मका, शेंगदाणा पेंड, वैरण ई. समावेश करण्यात येत आहे. तर गोठ्यात बैलांच्या पायाला किंवा शरीराला कुठलीही इजा होऊ नये या उद्देशाने गोठ्यात गादीदार वस्तुंचा वापर केला जात आहे. बैलांची वैद्यकीय तपासणी जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून केली जाणार असून आवश्यक औषध लसीकरणही केले जाणार आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यातील चांदीचा रथ ओढण्याचे भाग्य आमच्या बैलांना मिळत असल्याने आम्ही आंनदी असल्याची भावना तुळशीराम भोसले, सागर भोसले व रोहित भोसले यांनी व्यक्त केली.

Web Title: Mauli's chariot is honored this year by Sonya Monya bullock pair Visiting Vithuraya on June 11

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.