माऊलींची वारी आज स्वगृही परतणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:08 AM2021-07-24T04:08:59+5:302021-07-24T04:08:59+5:30
पंढरपूर येथे आषाढी एकादशी व बारशीच्या दिवशी विधिवत कार्यक्रम पार पडले आहेत. शनिवारी (दि. २३) सकाळी पवमान अभिषेक, ...
पंढरपूर येथे आषाढी एकादशी व बारशीच्या दिवशी विधिवत कार्यक्रम पार पडले आहेत. शनिवारी (दि. २३) सकाळी पवमान अभिषेक, दुधारती व महापूजा होईल. त्यानंतर आषाढी सोहळ्यातील काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर माऊलींच्या चलपादुका विठुचरणी ठेऊन अनोखी भेट होईल. खिरापतीचा कार्यक्रम झाल्यानंतर नगरप्रदक्षिणा घालून माऊलींचा सोहळा दोन बसद्वारे आळंदीकडे परतीच्या प्रवासासाठी मार्गस्थ होईल.
पंढरपूर-वाखरी-लोणंद-जेजुरी-पुणे-विश्रांतवाडी मार्गे वडमुखवाडीतील थोरल्या पादुकांची आरती घेऊन रात्री दहाच्या दरम्यान हा सोहळा स्वगृही दाखल होईल. परंपरेनुसार विधिवत कार्यक्रम, मंदिर प्रदक्षिणा, महापूजा व आरती घेऊन माऊलींच्या चलपादुका कारंज्या मंडपात स्थानापन्न करण्यात येतील.
--
फोटो क्रमांक : २३ आळंदी माऊलीची पालख परतणार.
फोटो ओळ : पंढरपूर येथे स्थानापन्न असलेल्या माऊलींच्या चलपादुका.