साप्ते आत्महत्या प्रकरणातल्या मौर्य-दुबेची ७ बँक खाती ‘लिंक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:09 AM2021-07-17T04:09:55+5:302021-07-17T04:09:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कलादिग्दर्शक राजेश साप्ते आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी राकेश मौर्य आणि फरार आरोपी अशोक दुबे ...

Maurya-Dubey's 7 bank accounts 'linked' in Sapte suicide case | साप्ते आत्महत्या प्रकरणातल्या मौर्य-दुबेची ७ बँक खाती ‘लिंक’

साप्ते आत्महत्या प्रकरणातल्या मौर्य-दुबेची ७ बँक खाती ‘लिंक’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कलादिग्दर्शक राजेश साप्ते आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी राकेश मौर्य आणि फरार आरोपी अशोक दुबे या दोघांची एकूण ७ बँक खाती ‘लिंक’ असल्याचे पोलीस तपासातून स्पष्ट झाले आहे. धमकी व खंडणी उकळून मौर्य याने कमावलेले पैसे जप्त करायचे आहेत. त्याने केलेल्या व्यवहारांची चौकशी करायची आहे. तसेच मौर्यचा मोबाईल डाटा जप्त करून त्याचे विश्लेषण करायचे असल्याचे सांगत सरकारी वकील नितीन कोंघे यांनी त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करीत या प्रकरणात अटक केलेल्या राकेश सत्यानारायण मौर्यला २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

या गुन्ह्यात दीपक उत्तम खरात (वय ३७, रा. गोरेगाव) याला यापूर्वी अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर चंदन रामकृष्ण ठाकरे (वय ३६, रा. मुंबई) आणि नरेश बाबूराव विश्वकर्मा (वय ३९, रा. पालघर) हे आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. गंगेश्वर अवधेश श्रीवास्तव आणि अशोक रमापती दुबे (दोघेही रा. मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मौर्याला शुक्रवारी (ता.१६) न्यायालयात हजर करण्यात आले होते. मौर्य हा या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे. त्यामुळे गुन्ह्याचा पुढील तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याचा युक्तिवाद अॅड. कोंघे यांनी केला. वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Web Title: Maurya-Dubey's 7 bank accounts 'linked' in Sapte suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.