Maval Lok Sabha Result: बारणेंची हॅट्ट्रिक की वाघेरे-पाटील गुलाल उधळणार? सट्टा बाजारात कोण कुठे?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 07:58 AM2024-06-04T07:58:34+5:302024-06-04T08:03:01+5:30
लोकसभेच्या मावळ मतदारसंघात शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये सरळ लढत रंगली. यात एकनाथ शिंदे गटातर्फे धनुष्यबाण चिन्हावर श्रीरंग बारणे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे मशाल चिन्हावर संजोग वाघेरे पाटील निवडणूक रिंगणात होते (Maval Lok Sabha Election 2024, Maval Lok Sabha Election 2024 Live, Maval Lok Sabha Election 2024 Live Updates,
Maval Lok Sabha Result 2024 | पिंपरी : लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत सर्वसामान्य मतदारांप्रमाणेच सट्टा बाजारालाही उत्सुकता आहे. मावळचा खासदार कोण होणार?, श्रीरंग बारणे (Shrirang Barne) हॅट्ट्रिक करणार की संजोग वाघेरे-पाटील (Sanjog Waghere Pati) विजयाचा गुलाल उधळणार याबाबत चर्चा रंगत आहेत. त्यानुसार सट्टा बाजारातही मोठी उलथापालथ झाल्याचे दिसून येते. (Lok Sabha Election Latest New)
लोकसभेच्या मावळ मतदारसंघात शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये सरळ लढत रंगली. यात एकनाथ शिंदे गटातर्फे धनुष्यबाण चिन्हावर श्रीरंग बारणे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे मशाल चिन्हावर संजोग वाघेरे पाटील निवडणूक रिंगणात होते. वाघेरे यांनी डिसेंबरपासून प्रचाराला सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांनी प्रचारात आघाडी घेतली होती.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना बारणे यांना उमेदवारी जाहीर झाली. दरम्यान, वाघेरे यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून वातावरण निर्मिती केली. त्यामुळे सट्टा बाजारात प्रचार काळात वाघेरे यांना पसंती देण्यात आली. मतदानाच्या दिवशीही त्यांची सट्टा बाजारात चलती होती. गेल्या आठवड्यापासून बारणे यांच्याकडे सट्टा बाजाराचा कल झुकल्याचे दिसून आले.
कुणाला किती भाव?
उमेदवाराचे नाव पैसे / रुपये
१) श्रीरंग बारणे ३०- पैसे
२) संजोग वाघेरे पाटील- २ रुपये