पुरंदरच्या मावळ्यांनी केली तोरणा गडाची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:21 AM2020-12-03T04:21:59+5:302020-12-03T04:21:59+5:30
पुरंदर तालुक्यातील शिवसह्याद्री ट्रेकर्सची दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवतात. कोरोनाकाळात बंद असलेली मंदिरे सुरु करण्यात आली. यामुळे शिवसह्याद्री ट्रेकर्सचे संस्थापक ...
पुरंदर तालुक्यातील शिवसह्याद्री ट्रेकर्सची दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवतात. कोरोनाकाळात बंद असलेली मंदिरे सुरु करण्यात आली. यामुळे शिवसह्याद्री ट्रेकर्सचे संस्थापक अध्यक्ष संतोष यादव व जयेश गद्रे यांनी ५१ वी दूर्ग मोहिम म्हणून पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात असणारा ''''किल्ले तोरणा'''' ( प्रचंडगड ) या ठिकाणी दुर्गभ्रमंती व दुर्गसंवर्धन मोहीम राबविली. यावेळी किल्ल्यावरील मंदिराची साफसफाई, बिनी दरवाजातील साफसफाई तसेच चढाई मार्गातील पाय-या व्यवस्थित व स्वच्छ करण्याचे काम शिवसह्याद्री ग्रुप कडून करण्यात आले. किल्ले तोरणा वरील ध्वज वा-यामुळे जिर्ण झाला होता यामुळे शिवसह्याद्री ट्रेकर्सच्या सदस्यांनी आपल्या हातात असणारा ध्वज तोरणा गडावरती फडकवला. यावेळी शिवसह्याद्री ट्रेकर्समध्ये संस्थापक अध्यक्ष संतोष यादव, पुणे जिल्हा बॅकेचे अधिकारी जयेश गद्रे, अक्षय यादव,नंदकुमार कांबळे, मंदार यादव, गणेश यादव, शुभम जाधव, संजय यादव तन्मय बहीरट, सचिन यादव उपस्थित होते.
फोटो
०२ भुलेश्वर
पुरंदर मधील शिवसह्याद्री ट्रेकर्सनी तोरणा गडावरती स्वच्छता केली.