माळेगाव नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने कोविड लस द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:10 AM2021-05-25T04:10:49+5:302021-05-25T04:10:49+5:30
नगरपंचायत सभागृहात पंचायत समिती सदस्य संजय भोसले व कामगारांची बैठक संपन्न झाली. यावेळी कामगारांनी कोरोनाची लस तातडीने देण्याची मागणी ...
नगरपंचायत सभागृहात पंचायत समिती सदस्य संजय भोसले व कामगारांची बैठक संपन्न झाली. यावेळी कामगारांनी कोरोनाची लस तातडीने देण्याची मागणी केली. यावेळी शंकर ठोंबरे, राजू शेख, आबा चव्हाण, दादा ठोकळ, दिलीप जाधव, सेहवाग सोनवणे, विकास जाधव, संजय रिठे, संदीप शिंदे, रणजित जाधव, पप्पू भोसले, रेश्मा शेख, माया कदम उपस्थित होते.
संजय भोसले म्हणाले की, नगरपंचायतीत एकूण ५७ कामगार आहेत. हे कामगार कार्यालयीन, आरोग्य, सफाई, वसुली व पाणीपुरवठा विभागात काम करत आहेत. माळेगाव नगरपंचायत ही कोरोना हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आली आहे. नगरपंचायतीचे कामगार हे कोरोना योध्दे आहेत. ते जिवावर उदार होऊन औषध फवारणी करतात. त्यांना कोरोना संबंधित सर्व कामे करावी लागतात, त्यामुळे त्यांना प्राधान्याने लस द्यावी.
तालुका वैद्यकीय अधिकारी मनोज खोमणे म्हणाले की, सध्या कोविडचा दुसरा डोस घेणाऱ्यांना लस देण्यात येत आहे. लस उपलब्ध झाल्यावर प्राधान्याने कामगारांना लस देण्यात येईल.
संजय भोसले यांच्या उपस्थितीत नगरपंचायत कार्यालयात कामगारांची कोविड लससंदर्भात बैठक पार पडली.
२४०५२०२१-बारामती-०६