मावशीच्या नवऱ्याकडूनच बलात्कार करून खून
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 02:31 AM2018-12-09T02:31:40+5:302018-12-09T02:31:55+5:30
धायरीतील बलात्कार करून खून झाल्याच्या प्रकाराचा छडा १२ तासांतच लावण्यात पोलीसांना यश आले आहे.
धायरी : धायरीतील बलात्कार करून खून झाल्याच्या प्रकाराचा छडा १२ तासांतच लावण्यात पोलीसांना यश आले आहे. मावशीच्या नवऱ्यायानेच अल्पवयीन युवतीवर बलात्कार करून तिचा खून केल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी नºहे येथे राहणाºया ३० वर्षांच्या युवकास पोलिसांनी अटक केली आहे. आई, वडील कामावर गेल्यानंतर एकट्या असणाºया या १७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्यात आला होता. सिंहगड पोलिसांना मध्यरात्री काही तांत्रिक माहिती तसेच सीसीटीव्ही फुटेज व चौकशीतून आरोपीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांना तपास करताना कोणीतरी ओळखीचे घरात आले असावे़ असे दिसले. त्यामुळेच या युवतीने दरवाजा उघडला असावा, असा अंदाज बांधून पोलिसांचा तपास सुरू होता़ ही युवती राहात असलेल्या इमारतीत आरोपी प्रवेश करीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले़ त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित केले़ त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर त्याच्या शरीराची संपूर्ण पाहणी
करता त्याच्या गळ्याजवळ खरचटल्याचे व्रण दिसून आले़
त्यामुळे त्याच्यावरचा संशय आणखी बळावला़ खोलात जाऊन चौकशी केल्यावर त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली़ हा प्रकार ६ डिसेंबरला दुपारी तीन ते सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान घडला होता़ त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले़ अधिक तपासासाठी न्यायालयाने १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली़
या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक संगीता यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गिरीश सोनवणे, संतोष सावंत, श्रीकांत दगडे, योगेश झेंडे, दत्ता सोनवणे, हरीश गायकवाड, दयानंद तेलंगे पाटील, सचिन माळवे, मयूर शिंदे, नीलेश कोलते, राहुल शेंडगे, अविनाश कोंडे, सुजित वाडेकर, नीलेश जमदाडे, किशोर शिंदे, संदीप पवार या पथकाने ही कामगिरी केली़ पोलीस निरीक्षक संगीता यादव अधिक तपास करीत आहेत़
धायरी येथील एक १७ वर्षांची युवती घरात एकटी असताना तिचा खून झाल्याचा प्रकार ६ डिसेंबरला सायंकाळी उघडकीस आला होता़
शवविच्छेदनात तिच्यावर बलात्कार करुन तिचा गळा दाबून खून झाल्याचे उघडकीस आले होते़