कारखाना निवडणुकीत ‘१०’च्या नोटांची कमाल

By Admin | Published: April 18, 2015 11:32 PM2015-04-18T23:32:37+5:302015-04-18T23:32:37+5:30

निवडणुकीच्या काळात मतदारांना प्रलोभन दाखविण्यावर कायद्याने बंदी आहे. मात्र, त्यातूनही मार्ग न काढणारे राजकारणी ते कसले.

The maximum number of '10' notes in the factory elections | कारखाना निवडणुकीत ‘१०’च्या नोटांची कमाल

कारखाना निवडणुकीत ‘१०’च्या नोटांची कमाल

googlenewsNext

बारामती : निवडणुकीच्या काळात मतदारांना प्रलोभन दाखविण्यावर कायद्याने बंदी आहे. मात्र, त्यातूनही मार्ग न काढणारे राजकारणी ते कसले. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ‘१० रुपयां’च्या नोटांनी कमाल केली, अशीच चर्चा होत आहे़ आर्थिक प्रलोभन दाखवून हक्काच्या मतदानाचा नवा फंडाही यानिमित्ताने पुढे आला आहे. सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीचे कवित्व आता या चर्चांमधून पुढे येत आहे.
कोणतीही निवडणूक दोन्ही बाजूच्या नेत्यांना प्रतिष्ठेची असते. त्यामुळे सर्व कायद्यांवर मार्ग काढून प्रचार केला जातो. निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला बंदी आहे. मात्र, मर्यादित मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी आर्थिक प्रलोभन दाखविले जाते. त्यातूनही अनेकदा अपयशच पदरी येते. अनेकदा तर विरोधकांकडून ‘पैसे त्यांचे घ्या, मतदान आम्हाला करा’ असेही सांगितले गेल्याची उदाहरणे असून त्यावर निवडणूक आयोगाने कारवाईही केली आहे. परंतु, आपल्याला शंभर टक्के मतदान घडवून आणण्यासाठी मतदारांना बांधून घेण्यासाठी नवी शक्कल लढविण्यात आली. मताला ठरलेल्या दरापैकी काही रक्कम रोख दिली. त्याबरोबरच एक दहा रुपयांची नोट देण्यात आली. या नोटेवरील शेवटचे तीन आकडे आणि संबंधित मतदाराचे नाव लिहून घेतले गेले. त्याला असेही सांगण्यात आले, की मतदान झाल्यावर निवडून आलो, तर ही १० रुपयांची नोट दाखविल्यावर उर्वरित रक्कम मिळेल. काल सायंकाळपासूनच निवडक मतदारांनी आपली १० रुपयांची नोट ‘कॅश’ करून घेतली. ऊसदरासाठी आंदोलन, किमान निर्धारित मूल्यासाठी (एफआरपी) आंदोलन केले जाते, त्या वेळी कारखान्याची आर्थिक स्थिती बेताची आहे; कारखानदारी अडचणीत येईल, असे सांगितले जाते. त्यामुळे शेतकरी सभासददेखील शांत बसतात. मात्र, निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात पैसा बाहेर येतो. त्यामुळे सभासदांचीदेखील ‘चांदी’ होते, हेदेखील यानिमित्ताने दिसून आले.

४राजकीय नेतेमंडळी आपल्या सोयीसाठी दबावाचे राजकारण करतात. सत्ताधाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी विरोधकांशी चर्चा करतात. तसेच किस्से सोमेश्वरच्या निवडणुकीत घडले. जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीच्या तोंडावर सोमेश्वरची निवडणूक होती. वजनदार नेत्यावर दबाव टाकण्यासाठी एका नेत्याने अगोदर विरोधकांशी संधान साधले. अटी, शर्ती घातल्या. सत्ताधाऱ्यांवर दबाव आणण्यात यश आले. जिल्हा बॅँकेला ‘बिनविरोध’चा शब्द घेतला. त्यानंतर विरोधकांशी चर्चा करण्याचेच थांबविले. मात्र, तोपर्यंत विरोधकांनी आखलेले डावपेच सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात ‘दबाव’ तंत्रातील नेत्यांना यश आले.

Web Title: The maximum number of '10' notes in the factory elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.