महापौर, उपमहापौर : आज अर्ज होणार दाखल

By admin | Published: March 8, 2017 05:09 AM2017-03-08T05:09:44+5:302017-03-08T05:09:44+5:30

महापालिका निवडणुकीनंतर महापौर आणि उपमहापौरदासाठी येत्या १५ मार्च रोजी निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी आज (बुधवारी) दुपारी ३ ते ५ या वेळेत नगरसचिव

Mayor, Deputy Mayor: File to apply today | महापौर, उपमहापौर : आज अर्ज होणार दाखल

महापौर, उपमहापौर : आज अर्ज होणार दाखल

Next

पुणे : महापालिका निवडणुकीनंतर महापौर आणि उपमहापौरदासाठी येत्या १५ मार्च रोजी निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी आज (बुधवारी) दुपारी ३ ते ५ या वेळेत नगरसचिव सचिव कार्यालयामध्ये अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी सौरभ राव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाने सर्वाधिक ९८ जागा मिळवून स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. त्यामुळे भाजपाचाच महापौर होणार हे निश्चित आहे. भाजपाकडून महापौरपदाच्या उमेदवारीसाठी ज्येष्ठ नगरसेविका मुक्ता टिळक यांना सर्वाधिक पसंती देण्यात आलेली आहे. उपमहापौरपद भाजपाकडून रिपाइंसाठी दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येणार आहे. रिपाइंचे नवनाथ कांबळे यांचे नाव यासाठी चर्चेत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीने महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक न लढविण्याची भूमिका घेतली आहे.

Web Title: Mayor, Deputy Mayor: File to apply today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.