वादाची चौकशी करण्याचे महापौरांनी दिले आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:13 AM2021-04-30T04:13:05+5:302021-04-30T04:13:05+5:30
पुणे : चौकट १ वादाची चौकशी करण्याचे महापौरांचे आदेश लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे व सहाय्यक ...
पुणे :
चौकट १
वादाची चौकशी करण्याचे महापौरांचे आदेश
लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे व सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांच्यात झालेल्या वादाची चौकशी करण्याचे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांना दिले आहेत.
अशा प्रकारे वाद योग्य नसून, या प्रकरणात कोण दोषी आहे हे शोधण्यात येऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. तर या वादामुळे नगरसेवक व अधिकाऱ्यांना समज देण्यात आली असून, अशा प्रकारे कोणीही वागू नये असे सांगण्यात आले असल्याचेही मोहोळ यांनी सांगितले.
----------
लसीकरण केंद्राची मी रितसर मागणी केली होती. त्यास परवानगी न देता अनधिकृत लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी आरोग्य प्रमुखांकडे गेलो होतो. त्याबाबत आम्ही जाब विचारला. त्यातून आपली चूक समोर येईल या भीतीने संबधित अधिकार्यांनी आकांड तांडव केला. आम्ही केवळ अधिकृत लसीकरण केंद्राचीच मागणी करत होतो बाकी काहीच नव्हते.
धनराज घोगरे, नगरसेवक
------------
अधिकारीही आता तणावात काम करीत आहेत
कोरोना आपत्तीत सर्वच अधिकारी खूप तणावात काम करत आहेत. दिवसरात्र त्यांना सर्वांना उत्तरे द्यावी लागत आहेत. अशावेळी अधिकाऱ्यांशी वाद घातले जात असतील तर आम्ही त्यांच्या बाजूने कायम राहणार. मात्र अधिकाऱ्यांनीही निपक्षपणे काम केले पाहिजे.
रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त पुणे मनपा.
-------