महापौरांचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

By admin | Published: March 5, 2017 04:25 AM2017-03-05T04:25:37+5:302017-03-05T04:25:37+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला एकहाती सत्ता मिळाली. त्यानंतर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती कोण होणार? याबाबतची

Mayor's decision in the Chief Minister's court | महापौरांचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

महापौरांचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला एकहाती सत्ता मिळाली. त्यानंतर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती कोण होणार? याबाबतची उत्सुकता शहरवासियांना आहे. याबाबत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पिंपरीत झाली. त्या वेळी महापालिकेतील पदाधिकारी निवडण्याचे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीष बापट यांना देण्यासंदर्भात ठराव करण्यात आला.
महापालिकेच्या निवडणुक निकालानंतर पिंपरी, चिंचवड की भोसरीचा महापौर होणार याबाबत उत्सुकता आहे. गटबाजी विषयीची चर्चा रंगली आहे.
या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित नगरसेवक, शहर पातळीवर पदाधिकाऱ्यांची बैठक पिंपरीत झाली. या वेळी पालकमंत्री गिरीष बापट, निरीक्षक सुजितसिंग ठाकूर, संघटन मंत्री रवी अनासपुरे, शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, आमदार महेश लांडगे, माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार, सदाशिव खाडे, उमा खापरे, महेश कुलकर्णी, आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्र्यांनी नगरसदस्यांची संवाद साधला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील नागरिकांनी निवडून दिले आहे. त्यामुळे विकास कामे करून घेण्यासाठी नगरसेवकांनी पाठपुरावा करावा व पारदर्शक कारभारासाठी प्रयत्न करावा. (प्रतिनिधी)

कोणत्या गटाला मिळणार प्राधान्य
महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती कोण होणार? याबाबत गेल्या आठवडाभरापासून चर्चा सुरू आहे. शहराध्यक्ष जगताप, आमदार लांडगे की खासदार साबळे यांच्यापैकी कोणत्या गटास प्राधान्य मिळणार याबाबत चर्चा सुरू आहे. दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यावर आजच्या बैठकीत पडदा पडला. पदाधिकारी निवडीचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात असून ते कार्य निर्णय घेतात याचकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Mayor's decision in the Chief Minister's court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.