मयुरेश्वराचा विवाह सोहळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:12 AM2021-09-11T04:12:57+5:302021-09-11T04:12:57+5:30
कोरोनामुळे राज्यातील इतर प्रार्थनास्थळ प्रमाणे अष्टविनायक प्रथम तीर्थक्षेत्र मयुरेश्वर मंदिर बंद आहे. मंगळवारपासून येथील भाद्रपद यात्रा उत्सव सुरु ...
कोरोनामुळे राज्यातील इतर प्रार्थनास्थळ प्रमाणे अष्टविनायक प्रथम तीर्थक्षेत्र मयुरेश्वर मंदिर बंद आहे. मंगळवारपासून येथील भाद्रपद यात्रा उत्सव सुरु आहे. मंदिर बंद असल्याने पूजाविधी, नैवद्य, महापूजा, छबिना, केव हे कार्यक्रम होत आहे. चतुर्थीच्या निमित्ताने पहाटे गुरव मंदिरडळींची पूजा झाली तर सकाळी ७ वाजता सालकरी विजय ढेरे यांची पूजा झाली. महासाधू मोरया गोसावी प्राप्त मंगलमूर्ती सोहळ्याचे गुरूवारी सायंकाळी ७ वाजता सनई , ढोल मोरया मोरयाच्या मंगलमई सुरात आगमन झाले. चतुर्थीच्या निमित्ताने चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्तांनी श्रींची पूजा केली. गणेश स्थापना, भाद्रपद यात्रा या दुहेरी योगामुळे बेंगलोर, हैदराबाद, मुंबई, ठाणे, सांगली, कर्नाटक आदी ठिकाणावरून भक्त दर्शनासाठी आले होते .
दिवसभर भाविकांची मंदियाळी सुरु होती. उत्सवाच्या निमित्ताने मयुरेश्वर मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई केली होती. गणेश उत्सव काळात तरी सरकारने मंदिर दर्शनासाठी खुली करावी असे साकडे येणारे भक्त मयुरेश्वराला घालत होते. रात्री अभ्यंगस्नान, श्रींचा विवाह सोहळा, शेंदुरपुडा, छबिना, मोरया गोसावी पदे आदी कार्यक्रम झाले.