महाळुंगेच्या सरपंचपदी मयुरी महाळुंगकर,उपसरपंचपदी ऋषिकेश मिंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:13 AM2021-02-25T04:13:31+5:302021-02-25T04:13:31+5:30
श्री क्षेत्र महाळुंगे ग्रामपंचायतीत आज दि. २४ ला झालेल्या सरपंच,उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी ४ अर्ज दाखल झाले होते. सरपंच पदासाठी ...
श्री क्षेत्र महाळुंगे ग्रामपंचायतीत आज दि. २४ ला झालेल्या सरपंच,उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी ४ अर्ज दाखल झाले होते. सरपंच पदासाठी वैशाली संतोष जावळे,जयश्री अनिल वाळके ,मयुरी प्रताप महाळुंगकर , अर्चना मुकुंद महाळुंगकर यांचे अर्जहोते. उपसरपंच पदासाठी लक्ष्मण धोंडिबा महाळुंगकर, नितीन तानाजी फलके, ऋषिकेश शामराव मिंडे,विश्वनाथ तुकाराम महाळुंगकर यांनी अर्ज भरले होते. जयश्री वाळके व अर्चना मानकर यांनी अर्ज मागे घेतल्याने थेट लढत वैशाली जावळे व मयुरी महाळुंगकर यांच्यात झाली. महाळुंगकर यांना नऊ तर यामध्ये जावळे यांना आठ मते मिळाली. नितीन फलके व विश्वनाथ महाळुंगकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने उपसरपंच पदासाठी ऋषिकेश मिंडे व लक्ष्मण महाळुंगकर यांच्यात लढत झाली. मिंडे यांना दहा मते व महाळुंगकर यांना सात मते पडली या सरपंच उपसरपंच निवडणुकीत सरपंचपदी मयुरी महाळुंगकर तर उपसरपंचपदी ऋषीकेश मिंडे यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.डी.राखोंडे , सहायक म्हणून ग्रामविकासाधिकारी सोमनाथ पारासुर, यांनी काम पाहिले.
नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी महाळुंगे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
श्री समर्थ सद्गुरु श्रीपती बाबा महाराज यांची श्री विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये भव्यसन्मान करण्यात आला व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
* * * * * * * * * * *
फोटो श्री क्षेत्र म्हाळुंगे गावच्या नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचा सन्मान करताना ग्रामस्थ.