Pune | कोंढव्यातील खंडणीखोर आसिफ खान टोळीवर मोक्का कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 08:08 PM2022-12-13T20:08:58+5:302022-12-13T20:11:07+5:30

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी चालू वर्षात ५१वी व एकूण ११४वी मोक्का कारवाई...

mcoca action against extortionist Asif Khan gang in Kondhwa | Pune | कोंढव्यातील खंडणीखोर आसिफ खान टोळीवर मोक्का कारवाई

Pune | कोंढव्यातील खंडणीखोर आसिफ खान टोळीवर मोक्का कारवाई

googlenewsNext

पुणे : संघटित गुुन्हेगारी करून दहशत निर्माण करून खंडणी मागणाऱ्या कोंढवा पसिरातील आसिफ खान व त्याच्या पाच साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार (मोक्का)अंतर्गत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी चालू वर्षात ५१वी व एकूण ११४वी मोक्का कारवाई आहे.

टोळीप्रमुख आसेफ ऊर्फ आसिफ ईस्माईल खान (वय २३) इरफान हसन भोला (वय २५, रा. पर्वती), शहाबाज मेहमुद खान (वय ५०, रा. संतोषनगर, कात्रज), समीर मेहबूब शेख (वय ३६, रा. संतोषनगर, कात्रज), फरियाज हसनलाल पठाण (वय ३२, रा. संतोषनगर, कात्रज) आणि जॉन अशी मोक्का कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

आसिफ खान यांच्या टोळीवर खराडीतील आयटी पार्कमधील कंपनीच्या मालकास धमकावून खंडणी घेतल्याचा गुन्हा चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल आहे. खान हा त्याच्या सहा साथीदारांना वेळोवेळी बदलून बरोबर घेऊन चंदननगर, तसेच करमाड, औरंगाबाद ग्रामीण या पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध दरोडा व खंडणी मागणे असे गुन्हे दाखल आहेत. स्वत:स व टोळीचे सदस्यांना अवैध मार्गाने आर्थिक लाभ करून गंभीर गुन्हे वारंवार संघटितपणे करीत आहे. त्यामुळे चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्यामार्फत मोक्का प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे सादर केला होता. चव्हाण यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून त्याला मंजुरी दिली. सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव अधिक तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर, सहायक पोलिस निरीक्षक मनोहर सोनवणे, उपनिरीक्षक अरविंद कुमरे, पोलिस अंमलदार राजेश नवले, रामचंद्र गुरव, नाना पतुरे, सागर तारू, अनुप सांगळे यांनी केली आहे.

Web Title: mcoca action against extortionist Asif Khan gang in Kondhwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.