Pune Crime: हुसेन उर्फ सोन्या युनुस शेख व त्याच्या ९ साथीदारांविरोधात मोक्का

By नितीश गोवंडे | Published: September 9, 2023 05:46 PM2023-09-09T17:46:33+5:302023-09-09T17:47:14+5:30

येरवडा परिसरात माजवली होती दहशत...

mcoca against Hussain alias Sonya Yunus Shaikh and his 9 accomplices | Pune Crime: हुसेन उर्फ सोन्या युनुस शेख व त्याच्या ९ साथीदारांविरोधात मोक्का

Pune Crime: हुसेन उर्फ सोन्या युनुस शेख व त्याच्या ९ साथीदारांविरोधात मोक्का

googlenewsNext

पुणे : येरवडा परिसरात दहशत माजवणाऱ्या हुसेन उर्फ सोन्या युनुस शेख आणि त्याच्या टोळीतील ९ साथीदारांविरोधात पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

येरवडा येथील इराणी मार्केट परिसरात हुसेन शेख आणि त्याचा साथीदार रुपेश राजगुरू यांनी जुने भांडण मिटवण्यासाठी एका तरुणाकडे १ लाख रुपयांची खंडमी मागितली होती, ती देण्यास नकार दिल्याने हुसेन आणि त्याच्या टोळीने या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले होते. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून टोळीप्रमुख हुसेन आणि त्याचे तीन साथीदार पसारच आहेत, मात्र हुसेन सह त्याचे साथीदार  वसीम हैदरअली भोगले (२२), अमिर उर्फ शंक्या युनूस शेख (१८, दोघे रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांच्यासह सहाजणांविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे. तसेच वसीम भोगले, अमिर शेख यांना अटक करण्यात आली आहे.

टोळीप्रमुख हुसेन शेख आणि साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा आणणे, घरफोडी, दुखापत करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे शाखेच्या निरीक्षक कांचन जाधव यांनी तयार केला होता. अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी या प्रस्तावाची पडताळणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास येरवडा विभागाचे सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील करत आहेत.

Web Title: mcoca against Hussain alias Sonya Yunus Shaikh and his 9 accomplices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.