पुण्यातील गुंड टोळीतील १२ जणांवर मोक्का; रिक्षाचालकांना मारहाण करून कात्रज भागात दहशत

By विवेक भुसे | Published: March 21, 2023 08:02 PM2023-03-21T20:02:27+5:302023-03-21T20:05:01+5:30

एक अल्पवयीन मुलासह ११ जणांच्या विरुद्ध मोक्का कारवाई...

mcoca on 12 gang members in Pune; Terror in Katraj area by beating rickshaw pullers | पुण्यातील गुंड टोळीतील १२ जणांवर मोक्का; रिक्षाचालकांना मारहाण करून कात्रज भागात दहशत

पुण्यातील गुंड टोळीतील १२ जणांवर मोक्का; रिक्षाचालकांना मारहाण करून कात्रज भागात दहशत

googlenewsNext

पुणे : प्रवाशांची वाट पाहत थांबलेल्या रिक्षाचालकांना मारहाण करून कात्रज भागात दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीच्या विरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले.

याप्रकरणी टोळीप्रमुख साकिब मेहबूब चौधरी उर्फ लतिफ बागवान (वय २३), रेहान सीमा शेख उर्फ रेहान दिनेश शेख (वय १९), अब्दुलअली जमालउद्दीन सय्यद (वय १९), संकेत किशोर चव्हाण (वय १८), ऋतिक चंद्रकांत काची (वय २१, सर्व रा. कात्रज), एक अल्पवयीन मुलासह ११ जणांच्या विरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे. आरोपी रेहान शेख, अब्दुलअली सय्यद, संकेत चव्हाण, ऋतिक काची यांना अटक करण्यात आली आहे. टोळीप्रमुख लतिफ बागवान याच्यासह सहाजणांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

कात्रज भागात प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका रिक्षाचालकावर बागवान आणि साथीदारांनी तीक्ष्ण शस्त्राने वार करून दहशत माजविली होती. भारती विद्यापीठ पोलिसांनी रिक्षाचालकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बागवान आणि साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. बागवान आणि साथीदारांच्या विरुद्ध खंडणी मागणे, जबरी चोरी, दुखापत करणे, दहशत माजविणे, असे गंभीर गुन्हे दाखल झाले होते. बागवान टोळीच्या विरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार, गुन्हे पोलिस निरीक्षक विजय पुराणिक, उपनिरीक्षक वैभव गायकवाड यांनी तयार केला. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, यांच्याकडे उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यामार्फत प्रस्ताव सादर करण्यात आला हाेता.

Web Title: mcoca on 12 gang members in Pune; Terror in Katraj area by beating rickshaw pullers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.