गुंड यल्ल्या काेळानट्टी टोळीवर 'मोक्का'; मंगला चित्रपटगृहासमाेर केला हाेता तरुणाचा खून
By प्रशांत बिडवे | Published: August 30, 2023 05:42 PM2023-08-30T17:42:32+5:302023-08-30T17:43:36+5:30
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी ५५ गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई केली आहे...
पुणे : मंगला चित्रपटगृहासमाेर वैमनस्यातून तरुणाचा खून करणाऱ्या गुंड सागर कोळानट्टी ऊर्फ यल्ल्या याच्यासह टाेळीतील एकूण २० जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी ५५ गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई केली आहे.
टोळी प्रमुख सागर ऊर्फ यल्ल्या इराप्पा कोळानट्टी (वय ३५), सुशील अच्युतराव सूर्यवंशी (वय २७), मल्लेश शिवराज कोळी (वय २४), मनोज विकास हावळे (वय २३), रोहन मल्लेश तुपधर (वय २३), शशांक ऊर्फ ऋषभ संतोष बेंगळे (वय २१), गुडगप्पा फकिराप्पा भागराई (वय २८), किशोर संभाजी पात्रे (वय २०), साहिल ऊर्फ सल्ल्या मनोहर कांबळे (वय २०), गणेश ऊर्फ गणपत शिवाजी चौधरी (वय २४), रोहित ऊर्फ मच्छी बालाजी बंडगर (वय २०), विकी ऊर्फ नेप्या काशीनाथ कांबळे (वय २२), इम्रान हमीद शेख (वय ३१) लॉरेन्स राजू पिल्ले (वय ३६), आकाश सुनील गायकवाड ऊर्फ चड्डी (वय २२), विवेक भोलेनाथ नवघरे (वय २५), अक्षय उर्फ बंटी विजय साबळे (वय २५), विनायक गणेश कापडे (वय २१), प्रदीप संतोष पवार (वय २१), सौरभ बाळू ससाणे (वय २०) अशी मोक्का कारवाई केलेल्यांची नावे आहेत.
आराेपींनी वर्चस्वाच्या वादातून मंगला चित्रपटगृहासमाेर नितीन म्हस्के याचा खून केला, तसेच त्याच्यासाेबत असलेल्या मित्रावर हल्ला केला होता. गुंड यल्ल्या आणि त्याच्या साथीदारांनी हिंसक गुन्हे करीत नागरिकांत दहशत निर्माण केली हाेती. त्यांच्याविराेधात शहरातील विविध पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. खुनाच्या प्रकरणात यल्ल्या टाेळीला अटक केली हाेती. शिवाजीनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनंजय गोडसे यांनी आरोपींविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव उपायुक्त संदीपसिंह गिल यांच्याकडे सादर केला होता. अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी प्रस्तावाची पडताळणी केली. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी आरोपींविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले.
सहायक आयुक्त वसंत कुंवर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, गुन्हे शाखेचे निरीक्षक विक्रम गौड, सहायक निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, मेमाणे, दिलीप नागर, रोहित झांबरे आदींनी ही कारवाई केली.