आमदार मेधा कुलकर्णी यांचे जनसंपर्क कार्यालय अनधिकृत
By admin | Published: September 2, 2016 05:51 AM2016-09-02T05:51:46+5:302016-09-02T05:51:46+5:30
कोथरूड मतदारसंघाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांचे डहाणूकर कॉलनी व किमया हॉटेलसमोरील जनसंपर्क कार्यालय अनधिकृतपणे उभारण्यात आले असल्याची तक्रार स्थानिक नागरिक
पुणे : कोथरूड मतदारसंघाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांचे डहाणूकर कॉलनी व किमया हॉटेलसमोरील जनसंपर्क कार्यालय अनधिकृतपणे उभारण्यात आले असल्याची तक्रार स्थानिक नागरिक कैलास भिंगारे, दिलीप खोपडे यांनी केली आहे.
महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडे मेधा कुलकर्णी यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयासाठी परवानगी घेण्यात आली आहे का, याची विचारणा कैलास भिंगारे यांनी माहिती अधिकारांतर्गत केली होती. त्यामध्ये त्या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय उभारण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती प्रशासनाकडून त्यांना देण्यात आली आहे.
डहाणूकर कॉलनी व हॉटेल किमयासमोर अनधिकृतपणे कार्यालये उभारण्यात आल्याने पादचाऱ्यांना तेथून येण्या-जाण्यासाठी मोठा अडथळा होत आहे. त्यामध्ये अनधिकृतपणे उभारण्यात आलेली कार्यालये हटविण्यात यावीत. याप्रकरणी त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशी मागणी भिंगारे, दिलीप खोपडे, आनंद जाधव, धनराज थोरात, राज गांगुर्डे यांनी केली आहे.
ते माझे कार्यालय नाही :‘‘तक्रार करण्यात आलेले माझे जनसंपर्क कार्यालय नाही. कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी बॅनर लावलेले असावेत. मंडईची नासधूस केल्याप्रकरणी आम्ही काहीजणांविरुद्ध महापालिकेच्या आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यामुळे त्यांच्याकडून असे आरोप करण्यात येत आहेत.’’- मेधा कुलकर्णी, आमदार