व्हॉटस्अ‍ॅपद्वारे होणार ""मी सावरकर"" दृकश्राव्य वक्तृत्व स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:14 AM2020-12-30T04:14:21+5:302020-12-30T04:14:21+5:30

पुणे : स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्यातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त ''''मी सावरकर - एक अभिनव ...

'' '' Me Savarkar '' '' Audio Rhetoric Competition to be held through WhatsApp | व्हॉटस्अ‍ॅपद्वारे होणार ""मी सावरकर"" दृकश्राव्य वक्तृत्व स्पर्धा

व्हॉटस्अ‍ॅपद्वारे होणार ""मी सावरकर"" दृकश्राव्य वक्तृत्व स्पर्धा

Next

पुणे : स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्यातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त ''''मी सावरकर - एक अभिनव वक्तृत्व'''' स्पर्धेचे आयोजन केले आहे़. आॅडिओ आणि व्हिडीओद्वारे ही स्पर्धा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. १० जानेवारी २०२१ ही रेकॉर्डिंग पाठविण्याची अंतिम तारीख आहे. ही स्पर्धा नि:शुल्क असून जगभरातून कुठूनही या स्पर्धेमध्ये कोणालाही सहभागी होता येईल. वक्तृत्व स्पर्धेबरोबरच काव्य निरूपण तसेच वीर सावरकरांच्या नाट्यवाचनाचे सादरीकरण यांचाही समावेश आहे़.

यंदा ''''संगीतमय सावरकर'''' ही वेगळी संकल्पना असलेली स्पर्धा होणार असून, यामध्ये सावरकरांच्या कवितांचे नव्या चालीत सादरीकरण करायचे आहे. संकल्पना पंडित शौनक अभिषेकी यांची आहे. स्पर्धा संयोजनासाठी धनंजय बर्वे , रणजीत नातू, अमेय कुंटे, शैलेश काळकर, प्रवीण गोखले, कॅप्टन निलेश गायकवाड यांनी परिश्रम घेतले आहेत. डेक्कन एज्युकेशन सोसायटी हे स्पर्धेचे सहसंयोजक आहेत. ही स्पर्धा मराठी, हिंदी आणि इंग्रजी या माध्यमातून घेतली जाईल. या स्पर्धा विविध आठ गटांमध्ये होणार आहेत़.

Web Title: '' '' Me Savarkar '' '' Audio Rhetoric Competition to be held through WhatsApp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.