बिबवेवाडीमध्ये गरजूंना लॉकडाऊनमध्ये जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:08 AM2021-05-28T04:08:25+5:302021-05-28T04:08:25+5:30

पार्श्वनाथ सोशल ग्रुप बिबवेवाडी शाखेतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. यात दुष्काळग्रस्तांना मदत, रक्तदान शिबिर, शालेय साहित्य वाटप, गाईसाठी ...

Meals in lockdown to needy in Bibwewadi | बिबवेवाडीमध्ये गरजूंना लॉकडाऊनमध्ये जेवण

बिबवेवाडीमध्ये गरजूंना लॉकडाऊनमध्ये जेवण

Next

पार्श्वनाथ सोशल ग्रुप बिबवेवाडी शाखेतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. यात दुष्काळग्रस्तांना मदत, रक्तदान शिबिर, शालेय साहित्य वाटप, गाईसाठी चारा आदी कार्यक्रम घेतले जातात.

यावेळी ग्रुपचे किशोर बोरा आणि विशाल बाफना यांनी माहिती देताना सांगितले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सरकारला हा पुन्हा एकदा मोठा लॉकडाऊन करावा लागला. यामध्ये गरिबांचे आणि मजुरांचे खूपच हाल होत आहेत. आपणही समाजाचे काही देणे लागतो या विचारातून जैन सोशल ग्रुप तर्फे पुन्हा एकदा अन्नदान सुरू आहे. या उपक्रमाला ग्रुपच्या अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच हातभार लागत आहे.’

हे जेवण रोजच्या रोज देण्यासाठी शैलेश भन्साळी, गिरीश सोळंकी, पंकज पटवा, कपिल गांधी, रोहित बिनायकिया, संजय बोरा, विक्रम बोरा, आनंद धोका, मनोज खिवंसरा, नीलेश गांधी यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबवला जात आहे.

................................................................................

फोटो ओळ:-पार्श्वनाथ सोशल ग्रुपतर्फे रोज २५० गरजू लोकांना रोज जेवण वाटप करण्यात येत आहे.

Web Title: Meals in lockdown to needy in Bibwewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.