लाॅकडाऊनमध्ये गरजू, गरिबांना दहा रुपयांमध्ये भोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:09 AM2021-04-15T04:09:06+5:302021-04-15T04:09:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: लाॅकडाऊन कालावधीत ओसवाल बंधू समाजाच्या वतीने पूना मर्चंट चेंबर्स यांच्या सहकार्याने गरजू व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: लाॅकडाऊन कालावधीत ओसवाल बंधू समाजाच्या वतीने पूना मर्चंट चेंबर्स यांच्या सहकार्याने गरजू व गरीब लोकांना फक्त दहा रुपये शुल्कामध्ये भोजन थाळी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाने कडक निर्बंध जाहीर केले आहेत. त्यामुळे बाहेर गावावरून येणारे गाडीवाले व इतर गरीब घटकांकरिता मुख्यमंत्र्यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन ही व्यवस्था सुरू करण्यात येत आहे. थाळीमध्ये मसाले भात, पुरी, भाजी व एक मिष्ठान्न देण्यात येणार आहे अशी माहिती ओसवाल बंधू समाजाचे अध्यक्ष व पूना मर्चंट चेंबरचे माजी अध्यक्ष वालचंद देविचंद संचेती यांनी दिली. याप्रसंगी ओसवाल बंधू समाजाचे उपाध्यक्ष प्रकाश पारख, सचिव जवाहरलाल बोथरा, पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल उपाध्यक्ष अशोक लोढा, सचिव विजय मुथा उपस्थित होते.
शहरामध्ये या ठिकाणी मिळेल दहा रुपयात भोजन
भोजन स्थळ-
- वर्धमान सांस्कृतिक केंद्र
651, गंगाधाम कात्रज रोड, बिबवेवाडी, पुणे 37.
- पूना मर्चंट चेंबर्स, व्यापार भवन मार्केट यार्ड पुणे 37.
भोजन वेळ-
सकाळी 11 ते 1 व सायंकाळी 5 ते 6