झिका संसर्गाबाबत अतिसंवेदनशील गावात उपाययोजन व जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:15 AM2021-08-12T04:15:17+5:302021-08-12T04:15:17+5:30

पुरंदर आरोग्य विभागाने संवेदनशील गावांमध्ये उपाययोजन व जनजागृती करायला सुरुवात केली आहे. झिका, डेंग्यू व चिकुणगुनियासदृश रुग्णांचे प्रमाण वाढत ...

Measures and public awareness in Zika village vulnerable to Zika infection | झिका संसर्गाबाबत अतिसंवेदनशील गावात उपाययोजन व जनजागृती

झिका संसर्गाबाबत अतिसंवेदनशील गावात उपाययोजन व जनजागृती

Next

पुरंदर आरोग्य विभागाने संवेदनशील गावांमध्ये उपाययोजन व जनजागृती करायला सुरुवात केली आहे.

झिका, डेंग्यू व चिकुणगुनियासदृश रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मागील तीन वर्षांत सातत्याने डेंग्यू व चिकुणगुनिया या आजारांचा उद्रेक झालेली गावे ही झिका संसर्गाबाबत अतिसंवेदनशील म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जाहीर केली आहे.

जिल्ह्यातील या ७९ गावांना झिका व्हायरसचा संभाव्य धोका असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. या संभाव्य धोक्यामुळे या गावांंमध्ये तातडीच्या उपाययोजना देखील सुरू करण्यात आल्या आहेत. पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी, नीरा, बेलसर, ढुमेवाडी, पारगाव, सुपे (खुर्द) ही सात गावे झिका संसर्गाबाबत अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.

या गावातील ग्रामपंचायतींना झिका संसर्गाबाबत जनजागृती करण्याच्या सूचना तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वला जाधव यांनी दिली.

--

कोट

" एका गावात डेंग्यू, चिकुणगुनियाचे जास्त रुग्ण आढळल्यास उपाययोजना करण्यास सोयीस्कर होईल. त्यासाठी डेंग्यू,चिकुणगुनियाच्या रुग्णांची नोंद खासगी रुग्णालयांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात करणे अनिवार्य आहे. एक- दोन दिवस ताप सदृश आजार असल्यास रुग्णांनी निष्काळजीपणा न करता, प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्त तपासणी करून डेंग्यू, चिकुणगुनियाची तपासणी मोफत करून घ्यावी."

- डॉ. उज्ज्वला जाधव,

तालुका वैद्यकीय अधिकारी.

--

फोटो क्रमांक : १०झिका बाधित गाव

फोटोओळ : नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी नीरेतील प्रत्येक प्रभागात जाऊन महिलांच्या आरोग्याची तपासणी सुरू केली आहे.

100821\10pun_11_10082021_6.jpg

फोटो क्रमांक : १०नीरा झिका बाधीक गाव फोटोओळ : नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी नीरेतील प्रत्येक प्रभागात जाऊन महिलांच्य आरोग्याची तपासणी सुरु केली आहे.

Web Title: Measures and public awareness in Zika village vulnerable to Zika infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.