यांत्रिक पद्धतीने पाणीचोरी

By admin | Published: May 15, 2016 12:42 AM2016-05-15T00:42:45+5:302016-05-15T00:42:45+5:30

येथील भीमा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर पाणीचोरी सुरू आहे. भामा-आसखेड धरणातून नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले होते. या पाण्याची भीमा नदीपात्रात बऱ्याच ठिकाणी चोरी केली जात आहे

Mechanical water harvesting | यांत्रिक पद्धतीने पाणीचोरी

यांत्रिक पद्धतीने पाणीचोरी

Next

दौंड : येथील भीमा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर पाणीचोरी सुरू आहे. भामा-आसखेड धरणातून नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले होते. या पाण्याची भीमा नदीपात्रात बऱ्याच ठिकाणी चोरी केली जात आहे. पाणी दौंड तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेले खानवटेपर्यंत पोहचेल, अशी अपेक्षा होती. मात्र, हे पाणी वडगाव दरेकर या गावापर्यंतच पोहोचू शकले नाही, ते केवळ नदीपात्रातील पाणीचोरी आणि बेसुमार वाळू उपशामुळे झालेले खड्डे. तसेच ट्रॅक्टरच्या मशिनला विद्युत मोटार जोडून पाणी चोरी सुरू आहे. त्यामुळे वडगाव दरेकरच्या पुढील गावातील शेतकरी पाण्यावाचून वंचित राहिलेले आहेत.
जिथपर्यंत नदीपात्रात पाणी पोहोचले, त्याचा लाभ काही शेतकऱ्यांना झाला. नदी आटत चालली असल्याने ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचलेले आहे. ट्रॅक्टरच्या मशिनला विद्युत मोटार जोडून हे पाणी काही ठिकाणी यांत्रिकीकरणाच्या पद्धतीने सर्रासपणे चोरून ते टॅँकरमध्ये भरून इतरत्र वापरले जात आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. साधारणत: एका वाळूच्या ट्रकमधील वाळू धुण्यासाठी किमान ५०० लिटरच्या जवळपास पाणी लागते. परिणामी, तालुक्यात ठिकठिकाणी दररोज १०० च्या वर बेकायदेशीर ट्रकमधील वाळू धुतली जाते.
>निरगुडेतील बंधाऱ्यातून खासगी वापरासाठी उपसा
शेटफळगढे : निरगुडे (ता. इंदापूर) येथील खडकवासला कालव्यातून भरलेल्या बंधारा आणि लगतच्या खासगी विहिरीचा उपसा बंद करावा, अशी मागणी गावचे उपसरपंच ब्रह्मदेव केकाण यांनी केली आहे. नुकतेच खडकवासला कालव्यातून पिण्यासाठी पाणी देण्यात आले. त्यामधून सार्वजनिक विहिरीलगतचे बंधारे भरलेले आहेत. मात्र, बंधाऱ्यालगत अन्य खासगी विहिरी आणि विद्युतपंपाच्या माध्यमातून पाणी उपसा सुरू झाला आहे.
या पाणीउपशामुळे गावात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे बंधारे आणि सार्वजनिक विहिरीलगतचा खासगी पाणीउपसा बंद करावा, अशी मागणी उपसरपंच केकाण यांनी केली आहे. उपसा करणारे शेतकरी यांना उपसा बंदच्या सूचना तालुका प्रशासनने कराव्यात, सूचना करूनही जे उपसा करतील, त्या शेतकऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केकाण यांनी केली.

Web Title: Mechanical water harvesting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.