बाणेर येथील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलला वैद्यकीय उपकरणे भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:09 AM2021-06-24T04:09:41+5:302021-06-24T04:09:41+5:30
पुणे : महापालिकेच्या वतीने बाणेर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या दुसऱ्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलला, बुधवारी पुणे सिटी कनेक्ट संस्थेच्या वतीने ...
पुणे : महापालिकेच्या वतीने बाणेर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या दुसऱ्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलला, बुधवारी पुणे सिटी कनेक्ट संस्थेच्या वतीने सीएसआरअंतर्गत अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे भेट देण्यात आली़
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या उपस्थितीत, पुणे कनेक्टचे चेअरमन डॉ. गणेश नटराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी रुची माथूर व इतरांनी या उपकरांची हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहणी केली़ १५ आय़सीयू बेड, २० सेमी फ्लोवर बेड, ५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, ५ बीआयपीएपी युनिट पुणे सिटी कनेक्ट संस्थेने दिले आहेत़
पुणे महापालिका कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीसाठी प्राधान्याने पाऊले उचलत असल्याचे रुबल अग्रवाल यांनी या वेळी सांगितले़ कोरोनाबाधितांवर उपचारासाठी व्हेंटिलेटर, आयसीयू बेड आणि ऑक्सिजन प्लांटसारख्या पायाभूत सुविधांची उभारणी करतानाच, महापालिकेच्या या प्रयत्नांना आर्थिक पाठबळ मिळावे यासाठीही प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्या म्हणाल्या़
पुणे महापालिका व पुणे सिटी कनेक्ट यांच्या संयुक्त पातळीवर शहरात वस्तीपातळीवर नागरिकांच्या आर्थिक, सामाजिक विकासाचे काम कोविडकाळातही ऑनलाईन शिक्षण पध्दतीने सुरू असल्याची माहिती डॉ. गणेश नटराजन यांनी या वेळी दिली़ तसेच, महापालिकेच्या कोरोना आपत्ती निवारण कामात पुणे सिटी कनेक्ट कायम पुढे राहील, असेही ते म्हणाले़
--------------------------
फोटो मेल केला आहे़