घोटवडेत व्यापारी, व्यावसायिकांची वैद्यकीय तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:08 AM2021-04-29T04:08:48+5:302021-04-29T04:08:48+5:30
किराणा, भाजीपाला, डेअरी व इतर अत्यावश्यक बाबींची दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळीत चालू ठेवण्याची परवानगी असल्याने या ...
किराणा, भाजीपाला, डेअरी व इतर अत्यावश्यक बाबींची दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळीत चालू ठेवण्याची परवानगी असल्याने या व्यावसायिकांचा नागरिकाचा थेट संपर्क होत आहे. त्यानुसार दुकानदार व दुकानातील कामगार यांची कासार अंबोली येथील कोविड सेंटरमध्ये चाचणी करण्यात आली. त्यासाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रसाद अनिल तायडे व आरोग्य सेविका आरती सोमेश सुतार यांनी १६७ दुकानदार व त्यांचे कामगारांची वैद्यकीय तपासणी केली. त्यामध्ये १३ जणांना कोरोनाची लक्षणे आढळली. त्यांना कोरोना चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या वेळी सरपंच स्वाती भेगडे, उपसरपंच भीमाजी केसवड, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ भेगडे, राजाराम शेळके, संतोष गोडाबे, हनुमंत घोगरे, संभाजी गोडाबे, सारिका खाणेकर, भाग्यश्री देवकर, वैशाली कुंभार, मंगल गोडाबे, निकिता घोगरे उपस्थित होते. ग्रामपंचायत कर्मचारी हेमलता भेगडे, सोनाली गाडे, दत्तात्रय कुंभार, दत्तात्रय गोडाबे, हिना शेख, भुजंग गायकवाड यांनी मदतनीस म्हणून काम पाहिले. या कामाचे नियोजन ग्रामविकास अधिकारी राजाराम काशीलकर यांनी केले.
--